शिरसोली ( प्रतिनिधी ) – येथील बारी समाज विद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक इयत्ता दहावीची विद्यार्थीनी कु. रूपाली गवळी हिने केले तर सूत्रसंचालन कु. सोनाली बारी ने केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री आर एस आंबटकर सर हे होते मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी प्रभारी पर्यवेक्षक एस ए भदाणे हिंदी विभाग प्रमुख ज्येष्ठ शिक्षिका एस आर दुबे , ए आर कोळी , प्रशांत पाठक एन डी वाणी एम एस अस्वार आर आर बारी वैशाली कोळी हे शिक्षक उपस्थित होते. प्रथम मान्यवरांनी माता सरस्वतीचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.
या कार्यक्रमाप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी हिंदी दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले हिंदी दिनानिमित्त शाळेमध्ये देशभक्तीपर गीत गायन, कविता गायन कथाकथन,निबंध स्पर्धा घेण्यात आली. यात इ.10 विद्यार्थिनी कु.गायत्री माळी हिंदी राष्ट्रभाषा चे महत्व थोडक्यात विशद केले घनश्याम मराठे पल्लवी ताडे तृप्ती मराठे गायत्री माळी चेतन मराठे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका हिंदी विभाग प्रमुख श्रीमती एस आर दुबे मॅडम यांनी राष्ट्रभाषा हिंदी का महत्व 14 सप्टेंबर याच दिवशी राष्ट्रभाषा हिंदी दिवस का मनवला जातो हिंदी भाषेमुळे आपला होणारा सन्मान,संस्कार, भावना आपली संस्कृती जोपासली जाते. आपल्या देशात व विदेशात हिंदी भाषेचे महत्व किती आहे कोण कोणत्या देशात हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार होतो यावर आपल्या विचारातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री आर एस आंबटकर यांनी हिंदी भाषेच महत्व सांगितले आपल्या देशात विविध जातीचे धर्माचे प्रांताचे लोक असून त्यांच्यात एकात्मतेची भावना जागृत करणे हे कार्य राष्ट्रभाषा हिंदीच करू शकते. जगामध्ये प्रथम इंग्रजी चिनी व नंतर हिंदी बोलली जाणारी भाषा आहे भारतात रेल्वे विभाग, बँक, शाळा महाविद्यालय येथे हिंदी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो असे विचार त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले शेवटी कार्यक्रमाचे आभार कु.पायल बारी हिने केले.











