डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात विविध कृषी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू
जळगाव:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमयूएलयू), नाशिक अंतर्गत येणार्या येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध कृषी शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शेती किंवा व्यवसायाशी संबंधित शिक्षण घेऊ इच्छिणार्या ९वी व १० वी पास विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या महाविद्यालयात ९ वी पास विद्यार्थ्यांसाठी १ वर्षाचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम, तर १० वी पास विद्यार्थ्यांसाठी १ वर्षाचा कृषी अधिष्ठान अभ्यासक्रम (सर्व पदविका प्रथम वर्ष) उपलब्ध आहे. तसेच कृषी अधिष्ठान पूर्ण किंवा एटीकेटी असणार्या विद्यार्थ्यांसाठी उद्यानविद्या पदविका ( डिप्लोमा इन हॉर्टीकल्चर), कृषीव्यवसाय व्यवस्थापन पदविका, कृषी पत्रकारिता पदविका, फळबाग उत्पादन, भाजीपाला उत्पादन आणि फुलशेती व प्रांगणउद्यान हे दोन वर्षांचे पदविका अभ्यासक्रम शिकण्याची सोय आहे. या अभ्यासक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे नोकरी किंवा इतर शिक्षण सांभाळून अभ्यास करता यावा, यासाठी केवळ शनिवार व रविवार प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना कौशल्यधारित व रोजगारभिमुख शिक्षण दिले जाते.महाविद्यालयात अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल शिक्षण सुविधा आणि सुंदर व प्रशस्त परिसर उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शासनाच्या नियमानुसार खते, बियाणे व कीटकनाशक विक्री केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक ती पात्रता प्राप्त होऊ शकते.शासकीय नोकरीत कृषी सहायक, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक, कोतवाल सेवक ऑपरेटर तसेच इतर कृषी विषयक पदांसाठी हे शिक्षण उपयुक्त ठरते. कृषी कंपन्यांमध्ये सेल्स ऑफिसर, सेल्स प्रतिनिधी, फार्म सुपरवायझर, गार्डन सुपरवायझर किंवा साहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करण्याची संधी मिळते तसेच स्वतःचा कृषी उद्योग सुरू करून स्वयंरोजगार उभारता येतो. या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी १५ संप्टेबर पर्यत अंतिम मूदत आहे. प्रवेशासाठी लागणार्या कागदपत्रांमध्ये कास्ट, नॉन क्रिमीलेयर (चालू वर्ष), दहावीची गुणपत्रिका, टी.सी., आधार कार्ड, पॅन कार्ड, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर, फोटो आणि स्वाक्षरी यांचा समावेश असून, ऑनलाइन अर्ज नोंदणीनंतर हे कागदपत्र आवश्यक आहेत.विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी डॉ. शैलेश तायडे (९७४९४७१३३१), प्रा. निलेश सदारे (९५२७२०२१२६), प्रा. प्रवीण देवरे (९८५०४८५६४४), प्रा. शरद पाटील (९०२१७२६२१३) किंवा मोहन सूर्यवंशी (९५०३२६९४४४) यांच्याशी संपर्क साधावा.











