इन्स्टाग्रामवरून ओळख वाढवून जबरदस्तीने अत्याचार बदनामी करण्याची धमकी देत त्रास
जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील नेरी दिगर येथे तरुणीवर बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवून आरोपीने तरुणीला जामनेर-भुसावळ रोडवरील एका लॉजवर नेले. तेथे तिचे फोटो काढून त्यानंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, मार्च २०२६ पासून २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत आरोपीने नेरी दिगर येथे पीडितेशी संपर्क ठेवला. आरोपी भूषण रविंद्र पाटील याने पीडितेच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून तिच्याशी ओळख केली. त्यानंतर मोबाईलवरील संदेशांद्वारे तिच्याशी जवळीक साधली.
मार्च २०२६ मध्ये सकाळी सुमारे ११.३० वाजता आरोपीने पीडितेला जामनेर-भुसावळ रोडवरील एका लॉजवर नेले. तेथे काहीतरी आमिष दाखवून तिचे मोबाईलमध्ये फोटो काढले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला शिवीगाळ केली आणि वेळोवेळी लॉजवर नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याशिवाय आरोपीने पीडितेच्या इन्स्टाग्राम अकाउंटचा वापर करून तिच्या मोबाईलमध्ये अश्लील फोटो व संदेश टाकून तिची बदनामी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पीडितेच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ६४(२), ७९, ३५२ व ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदेश कीर्तिकर करीत असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिस नोंदीत नमूद आहे.









