जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव द्वारे प्रायोजित स्व. अविनाश दामले सर यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ “जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६”. चे आयोजन दिनांक ११ ते १३ सप्टेंबर २०२६ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघ येथील बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे.
स्पर्धेत ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील गटांसह खुला व ३५ वर्षांवरील वरिष्ठ गटांचा समावेश करण्यात आला आहे. मुलं व मुली तसेच पुरुष व महिला या गटांमध्ये एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूस नोंदणी करावी लागणार आहे. प्रवेश अर्ज https://forms.gle/ziPsGAxXdyw2cFeH9 या गुगल फॉर्मद्वारे स्वीकारले जातील. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. स्पर्धेतील प्रवेश फक्त जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी मर्यादित ठेवण्यात आले आहेत. स्पर्धेतील सामने भारतीय बॅडमिंटन संघटना यांच्या नियमांनुसार खेळविण्यात येणार आहेत. सामने सकाळी ७ वाजल्यापासून सुरू होतील.
निवड झालेले खेळाडू महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा स्पर्धेत जळगाव जिल्हय़ाचे प्रतिनिधित्व करतील.
या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव विनीत जोशी यांनी केले आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी किशोर सिंह ९९७०४ १४९५४ किंवा ९४२११ २११०६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









