नागलवाडी येथे विजेचा शॉक लागून ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू


चोपडा : प्रतिनिधी — चोपडा तालुक्यातील नागलवाडी येथे घरात विद्युत शॉक लागल्याने ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत व्यक्तीचे नाव सुनील वना पाटील (वय ४०, रा. नागलवाडी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे आहे. २८ ऑगस्ट रोजी नागलवाडी येथील राहत्या घरात त्यांना अचानक विद्युत शॉक लागला.
विद्युत शॉक लागल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे दाखल केले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच चोपडा शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद क्रमांक ६२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ प्रमाणे नोंद केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/१८०५ ज्ञानेश्वर जवागे करीत आहेत.









