• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर

८० फूट खोल विहिरीत शेतकऱ्याचा मृत्यू; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मृतदेह बाहेर

पिंपळे खुर्द येथील घटना; नयनतारा मॉलमधील सत्कार सोहळा सोडून रेस्क्यू किटसह धरणगावकडे रवाना झाले पथक

जळगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील पिंपळे खुर्द येथे स्वतःच्या शेतातील सुमारे ८० फूट खोल विहिरीत एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. वासुदेव भालेराव पाटील (वय ५४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260823-WA0135.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/08/VID-20260823-WA0135-1.mp4

सत्कार सोहळ्यादरम्यान आला मदतीचा कॉल

जळगाव शहरातील नयनतारा मॉलमध्ये एका न्यूज चॅनेलच्या २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभ सुरू होता. यावेळी आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि जळगाव शहर महानगरपालिकेचे महापौर उपस्थित होते.

कार्यक्रम सुरू असतानाच पिंपळे खुर्द येथे विहिरीत व्यक्ती पडल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. माहिती मिळताच कोणताही विलंब न करता अग्निशमन विभागाचे पथक रेस्क्यू किटसह थेट धरणगावच्या दिशेने रवाना झाले.

आतापर्यंत तीन व्यक्तींना दिले जीवदान

जळगाव महानगरपालिका अग्निशमन विभागाच्या पथकाने यापूर्वी विहिरीत पडलेल्या तीन व्यक्तींना जिवंत बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाची तत्परता आणि बचाव कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

याच तत्परतेचे दर्शन पिंपळे खुर्दच्या घटनेतही घडले. खोल विहिरीत व्यक्ती पडल्याची माहिती मिळताच पथकाने तातडीने घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले.

८० फूट खोल विहिरीत रेस्क्यू ऑपरेशन

कैलास मधुकर माळी यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन पथक पिंपळे खुर्द येथे दाखल झाले. वासुदेव पाटील हे त्यांच्या शेतातील सुमारे ८० फूट खोल विहिरीत पडल्याचे समोर आले. विहीर अत्यंत खोल असल्याने बचावकार्य आव्हानात्मक होते.

प्रमुख देविदास सुरवाडे, वाहनचालक प्रदीप धनगर, फायरमन रोहिदास चौधरी, यश मनोरे आणि योगेश पाटील यांनी रेस्क्यू किटच्या मदतीने विहिरीत उतरून बचावकार्य केले. गावकऱ्यांनीही या कार्यात सहकार्य केले.

रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित

अग्निशमन दलाच्या जवानांनी वासुदेव पाटील यांना विहिरीतून बाहेर काढल्यानंतर तातडीने धरणगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आत्महत्येचा प्राथमिक अंदाज; तपास सुरू

वासुदेव पाटील हे शेतकरी असून, दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रकरणी धरणगाव पोलिसांकडून पुढील कारवाई व तपास सुरू असून, तपासानंतर घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

अग्निशमन दलाची तत्परता पुन्हा अधोरेखित

एकीकडे सत्कार समारंभात अग्निशमन विभागाच्या कार्याचा गौरव होत असतानाच दुसरीकडे मदतीचा कॉल येताच पथकाने तत्काळ कार्यक्रमातून रवाना होऊन घटनास्थळी धाव घेतली. आपत्कालीन परिस्थितीत वेळेचे महत्त्व ओळखून अग्निशमन जवानांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद ठरली.


 

 

Previous Post

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

Next Post

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

स्टिअरिंग रॉड जाम झाल्याने बस कठड्याला अडकली; चार प्रवासी किरकोळ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

बंद घराचे कुलूप तोडून ५५ हजारांची रोकड लंपास

August 23, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा
Uncategorized

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

August 23, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

जळगावात घरकामाच्या मशीनची चोरी; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 23, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

जामनेरमध्ये गॅस एजन्सीच्या गोदामाबाहेरील १० सिलिंडर चोरीला

August 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

बंद घराचे कुलूप तोडून ५५ हजारांची रोकड लंपास

August 23, 2026
कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

कुऱ्हाडदे रस्त्यावरील जीर्ण सार्वजनिक शौचालय हटवून अन्यत्र उभारा

August 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon