• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

बालाजी पेठेतील पल्सर चोरीचा छडा; एरंडोल बसस्थानकातून संशयिताला ताब्यात घेतले

जळगाव | प्रतिनिधी : शहरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत शनिपेठ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. बालाजी पेठ येथून चोरीला गेलेल्या बजाज पल्सर मोटारसायकल प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्या ताब्यातून बजाज कंपनीच्या दोन पल्सर आणि होंडा कंपनीची एक युनिकॉर्न अशा तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

घराबाहेर असताना मोटारसायकल चोरीला

दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव शहरातील बालाजी पेठ परिसरातून बजाज पल्सर मोटारसायकल चोरीला गेली होती. मोटारसायकलचे मालक निलेश प्रकाश बोरसे (वय २७, रा. बालाजी पेठ, जळगाव) हे बाहेरगावी गेले होते. दि. १८ ऑगस्ट रोजी घरी परतल्यानंतर मोटारसायकल जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यानंतर त्यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक १७९/२०२६, बीएनएस कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणातून तपास

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी शनिपेठ पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मोटारसायकल व आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने बालाजी पेठ तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली.

परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून संशयिताबाबत माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून शेख इरफान शेख रईस (रा. एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव) याला एरंडोल बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले.

तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

संशयिताची चौकशी केली असता त्याने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. पुढील चौकशीत त्याच्याकडून बजाज कंपनीच्या दोन पल्सर आणि होंडा कंपनीची एक युनिकॉर्न अशा तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या आणखी काही घटनांचा उलगडा होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पथकाची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत परिमंडळ पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर, अभिषेक कटारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय खैरे, योगेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल पराग दुसाने, अमोल वंजारी, निलेश घुगे, गणेश ढाकणे, योगेश साबळे तसेच सीसीटीव्ही फुटेज विश्लेषक पोलीस कॉन्स्टेबल मुबारक देशमुख यांनी सहभाग घेतला.

गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ विजय खैरे करीत आहेत.


 

 

Previous Post

नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त
1xbet russia

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

August 23, 2026
नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?
1xbet russia

नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
जैन कंपनी

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
इंटर्नट्रॅक हॅकेथॉनमध्ये गोदावरी कॉलेजच्या ‘टीम अल्गोनिक्स’चा दिमाखदार
1xbet russia

टीम व्ह्यूअस्त्रचे रोबोटिक्स स्पर्धेत गोदावरी आयएमआरचे यश

August 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त

August 23, 2026
नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?

नेतृत्व नसलेली भाजप ५ वर्ष महापालिकेत टिकणार काय ?

August 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon