चाळीसगावात १८ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


सुलई माता नगरातील घटना; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
चाळीसगाव | प्रतिनिधी — चाळीसगाव शहरातील सुलई माता नगर परिसरात १८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रणव दिनेश रोकडे (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रणव रोकडे याला त्याचे वडील दिनेश हिलाल रोकडे यांनी मृतावस्थेत ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव येथे दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ८८/२०२६, BNSS कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.
प्रणवने कोणत्या कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमागील नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार ईश्वर पाटील करीत आहेत









