तापी नदीत बुडून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू


अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावाजवळ तापी नदीच्या पुलानजीक पाण्यात बुडून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
मृत तरुणाचे नाव निलेश मधुकर धनगर (वय २९, रा. किनगाव खुर्द, ता. यावल, जि. जळगाव) असे आहे. निलेश यांचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावाजवळ तापी नदीच्या पुलानजीक पाण्यात आढळून आला.
१४ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास निलेश यांच्या नातेवाईकांना त्यांचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संबंधितांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली.
या माहितीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ८७/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. निलेश धनगर यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचे प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील करीत आहेत. मृत्यूमागील नेमके कारण व अन्य बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.









