• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

तीन महिने उलटले, तरी न्यायाची प्रतीक्षा; १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण-लूट प्रकरणात कारवाई कुठे?

भुसावळ शहरातील धक्कादायक प्रकार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, मात्र आरोपींवर ठोस कारवाई नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव
0
तीन महिने उलटले, तरी न्यायाची प्रतीक्षा; १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण-लूट प्रकरणात कारवाई कुठे?

तीन महिने उलटले, तरी न्यायाची प्रतीक्षा; १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण-लूट प्रकरणात कारवाई कुठे?

भुसावळ शहरातील धक्कादायक प्रकार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, मात्र आरोपींवर ठोस कारवाई नसल्याचा कुटुंबीयांचा आरोप

भुसावळ : कामाच्या कारणावरून झालेल्या वादातून १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण करत त्याच्याकडील दागिने व रोकड लुटल्याची धक्कादायक घटना एप्रिलमध्ये भुसावळ शहरात घडली होती. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन तब्बल तीन महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापही आरोपींवर अपेक्षित कठोर कारवाई झालेली नसल्याचा आरोप पीडित तरुणाच्या आईने जिल्हाधिकारी कार्यालय येथे केला आहे. त्यामुळे “गुन्हा दाखल होऊनही कारवाईला विलंब का?” असा सवाल उपस्थित होत आहे.

 

मित्रांसोबत गेला अन् अमानुष मारहाणीला बळी

सुभाषनगर येथील १८ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ एप्रिल रोजी मित्राच्या फोनवरून तो भारतनगर परिसरात गेला होता. त्यानंतर मित्रांसोबत जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरामागील डम्पिंग यार्डजवळील एका पडक्या घरात ते गेले. तेथे एका मुलीकडे पाहण्याच्या जुन्या कारणावरून त्याच्याशी वाद घातला गेला.वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. फिर्यादीनुसार, त्याला खाली पाडून पट्ट्याने व चाबकाने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला विवस्त्र केल्याचा गंभीर आरोप आहे. एवढ्यावरच प्रकार थांबला नाही, तर त्याला दुसऱ्या ठिकाणी नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आली.

मारहाणीदरम्यान तरुणाच्या गळ्यातील दागिने तोडण्यात आले. त्यानंतर त्याच्या गळ्यातील चांदीची साखळी आणि हातातील चांदीचे ब्रेसलेट काढून घेतल्याचे पीडित तरुणाच्या आईने माध्यमांशी बोलतांना सांगितले.. या संपूर्ण घटनेनंतर घाबरलेल्या तरुणाने घरी जाऊनआई वडिलांना प्रकार सांगितला. दुखापत झाल्याने त्याच्यावर उपचार अद्यापही सुरु असून त्याचा जबडा गंभीर दुखापतीने ग्रस्त आहे . या प्रकरणी २४ एप्रिल रोजी सौरभ सोनवणे, सिद्धेश महाडीक, सागर साळुंके आणि वासिफ शेख यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल; बदनामीने कुटुंब हादरले

घटनेनंतर काही दिवसांनी तरुणाला विवस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या व्हिडीओमुळे तरुणाची मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली आणि त्याच्या मानसिक स्थितीवरही गंभीर परिणाम झाल्याचा दावा त्याच्या आईने केला आहे.

“मुलगा १८ वर्षांचा आहे. त्याच्यावर झालेल्या अत्याचाराची आणि त्याची बदनामी करणाऱ्या व्हिडीओची गंभीर दखल घेतली जात नाही, ही आमच्यासाठी वेदनादायक बाब आहे,” अशी भावना पीडिताच्या आईने व्यक्त केली.

मंत्र्यांकडे धाव; तरीही कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार अपेक्षित कारवाई नाही

घटनेनंतर पीडित तरुणाच्या पालकांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही आपली व्यथा मांडल्याचे सांगितले. त्यांच्या सूचनेनुसार कुटुंबीयांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार सांगितला. मात्र, त्यानंतरही आरोपींवर अपेक्षित कारवाई झाली नसल्याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

पीडिताच्या आईने १३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईबाबत आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

‘मुलगा घराबाहेर पडत नाही’; आईचा गंभीर आरोप

घटनेनंतर मुलगा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असून तो घराबाहेर पडत नसल्याचे आईचे म्हणणे आहे. परीक्षांनाही तो उपस्थित राहू शकलेला नाही, असा दावा त्यांनी केला. “माझा मुलगा सतत मानसिक तणावात आहे. घराबाहेर पडण्याचीही त्याची इच्छा होत नाही. त्याच्यावर झालेल्या प्रकारामुळे तो पूर्णपणे खचला आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौघांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी पीडिताच्या आईने केली.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, यातील एका आरोपीचा यापूर्वीच्या एका गोळीबाराच्या प्रकरणाशी संबंध असून तो नुकताच कारागृहातून बाहेर आला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित आरोपींच्या हालचाली आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणीही कुटुंबीयांकडून होत आहे.

तीन महिने उलटूनही प्रश्न कायम

या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन जवळपास तीन महिने झाले आहेत. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचा दावा, तरुणाची मानसिक अवस्था, दागिने लुटल्याचा आरोप आणि आरोपींवर कारवाईबाबत कुटुंबीयांची नाराजी या सर्व बाबींमुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

हद्दीच्या वादावरून टाळाटाळ

तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या पीडित तरुणाच्या आईने शहर पोलीस स्टेशनकडे तक्रार दाखल करण्यासाठी त्यांना घटना आमच्या हद्दीत घडली नाही तुम्ही बाजारपेठ पोलिसांकडे जाऊन तक्रार द्या असा सल्ला दिला. त्यामुळे आईने बाजारपेठ ठाणे गाठल्यावर त्यांनी सुद्दा हद्दीचा वाद सांगून शहर पोलिसांकडे तक्रार द्यावी त्यामुळे पोलिसांनीच हद्दीचा वाद काढून पीडित तरुणाच्या कुटुंबियांना नाहक त्रास सोसावा लागला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात आतापर्यंत कोणती कारवाई झाली? आरोपींची चौकशी, अटक किंवा इतर कायदेशीर प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे? व्हायरल झालेल्या व्हिडीओचा तपास करण्यात आला का? या प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. पीडित कुटुंबाची मागणी स्पष्ट आहे,घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि १८ वर्षीय तरुणाला न्याय मिळवून द्यावाअशी मागणी त्यांनी केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 


 

 

Tags: #bhusawal#crime
Previous Post

महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

Next Post

शेतकऱ्याच्या शेतातून २२ क्विंटल तयार केळीची चोरी; ३९ हजारांचा माल लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शेतकऱ्याच्या शेतातून २२ क्विंटल तयार केळीची चोरी; ३९ हजारांचा माल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

August 14, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

शेतकऱ्याच्या शेतातून २२ क्विंटल तयार केळीची चोरी; ३९ हजारांचा माल लंपास

August 14, 2026
तीन महिने उलटले, तरी न्यायाची प्रतीक्षा; १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण-लूट प्रकरणात कारवाई कुठे?
1xbet russia

तीन महिने उलटले, तरी न्यायाची प्रतीक्षा; १८ वर्षीय तरुणाला विवस्त्र करून मारहाण-लूट प्रकरणात कारवाई कुठे?

August 14, 2026
महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित
1xbet russia

महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम

August 14, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

शेतकऱ्याच्या शेतातून २२ क्विंटल तयार केळीची चोरी; ३९ हजारांचा माल लंपास

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon