• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 11, 2026
in Uncategorized
0
शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

शिवतीर्थ चौकाला मिळाले शिवकालीन वैभवाचे नवे रूप; सुप्रीम इंडस्ट्रीजच्या योगदानातून मावळ्यांची भव्य शिल्पे साकार

जळगाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा देणाऱ्या जळगाव शहरातील शिवतीर्थ चौकाच्या सौंदर्यात आता आणखी भर पडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील दुभाजक असलेल्या चौकात शिवकालीन मावळ्यांच्या भव्य आणि आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आल्याने संपूर्ण चौकाला ऐतिहासिक, देखणे आणि भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. जळगाव शहरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेणारा हा चौक आता शहराच्या सौंदर्यात मानाचा तुरा ठरत आहे.

जी.एम. फाउंडेशनच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या अभिनव उपक्रमाला सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव फाउंडेशनने भक्कम साथ देत या संपूर्ण कामाचे योगदान उचलले आहे. सुप्रीम इंडस्ट्रीजच्या सामाजिक बांधिलकीतून आणि शहराच्या सौंदर्यात भर घालण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनातून शिवतीर्थ चौकाचे हे सुशोभीकरण साकारले आहे. त्यामुळे उद्योग आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळत आहे.

या सुशोभीकरणाचा शुभारंभ आज जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जिवणे, महापौर दीपमाळा काळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, मान्यवर, सुप्रीम इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.

शुभारंभ सोहळ्याला शिवरायांच्या शौर्याला साजेसा उत्साह आणि जल्लोषाची किनार लाभली. सुगंध, शिवसूर्य, शौर्यवीर आणि शिव तांडव या ढोल पथकांनी दमदार ढोलवादनातून छत्रपती शिवाजी महाराजांना आणि मावळ्यांना जोरदार मानवंदना दिली. ढोल-ताशांच्या निनादाने संपूर्ण शिवतीर्थ चौक दुमदुमून गेला आणि परिसरात चैतन्याचे, उत्साहाचे आणि शिवमय वातावरण निर्माण झाले. उपस्थित मान्यवरांनी या ढोल पथकांचे जोशपूर्ण व दमदार सादरीकरणाचा मनमुराद आनंद घेतला. या उत्स्फूर्त वातावरणामुळे शुभारंभ सोहळ्याला विशेष रंगत आली.

शिवतीर्थ चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जळगावकरांच्या अस्मितेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. या पुतळ्यासमोरील परिसरात उभारण्यात आलेल्या शिवकालीन मावळ्यांच्या प्रतिकृतींमुळे चौकाला जणू शिवकालीन इतिहासाची जिवंत अनुभूती मिळत आहे. स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या मावळ्यांचे शौर्य आणि त्याग नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्याचे काम या सुशोभीकरणातून झाले आहे.

सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव फाउंडेशनचे विशेष कौतुक

शहराच्या विकासात उद्योगसमूहांनी केवळ आर्थिक योगदान न देता शहराची सांस्कृतिक ओळख, ऐतिहासिक वारसा आणि सार्वजनिक सौंदर्य यासाठीही पुढाकार घ्यावा, याचे आदर्श उदाहरण सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव फाउंडेशनने या उपक्रमातून घालून दिले आहे. जी.एम. फाउंडेशनची संकल्पना आणि सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव फाउंडेशनने दिलेले संपूर्ण योगदान यामुळे शिवतीर्थ चौकाला एक वेगळी ओळख मिळाली आहे.

शहरातील सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण करताना आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची सांगड घातल्यास शहराच्या सौंदर्याला एक वेगळेच वैभव प्राप्त होते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे. शिवतीर्थ चौकातून दररोज ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांना आता छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, मावळ्यांचे शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा या भव्य सुशोभीकरणाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.

जळगावच्या सौंदर्यात भर घालणारा, शिवरायांच्या इतिहासाची प्रेरणा देणारा आणि मावळ्यांच्या शौर्याला अभिवादन करणारा शिवतीर्थ चौकाचा हा नवा साज निश्चितच जळगावकरांच्या कौतुकाचा आणि अभिमानाचा विषय ठरत आहे. जी.एम. फाउंडेशनच्या संकल्पनेला सुप्रीम इंडस्ट्रीज जळगाव फाउंडेशनने दिलेली भक्कम साथ आणि केलेले संपूर्ण योगदान यामुळे हा उपक्रम शहराच्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा मानबिंदू ठरला आहे


 

 

Previous Post

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

Next Post

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!
1xbet russia

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!
1xbet russia

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
Uncategorized

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon