• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बारामतीतील खत कंपनीकडून अवैध खत विक्री अन् शासनाची फसवणूक; जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 9, 2026
in Uncategorized
0
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

बारामतीतील खत कंपनीकडून अवैध खत विक्री अन् शासनाची फसवणूक; जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव (विशेष प्रतिनिधी): विनापरवाना खतसदृश उत्पादनांची निर्मिती करून त्यांची अवैध वाहतूक, विक्री व वितरण करत शासनाची दिशाभूल आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बारामती (जि. पुणे) येथील नामांकित बायोकॅम कंपनीचे संचालक आणि प्रॉडक्शन मॅनेजर यांच्याविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भादली/नांद्रा बुद्रुक येथील ‘कृषी सेवा केंद्रात’ १४ जुलै २०२६ रोजी तपासणीदरम्यान अवैध खतसाठा आढळून आला होता. याप्रकरणी कृषी विभागाच्या वतीने सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीअंती मे. जयकिसन बायोकेम फर्टिलायझर्स (एल.एल.पी., एम.आय.डी.सी. बारामती, जि. पुणे) या कंपनीने कोणत्याही वैध परवान्याशिवाय खतसदृश उत्पादनांची निर्मिती केली. तसेच विनापरवाना विक्री व वाहतूक करून शासनाची दिशाभूल करत फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी पंचायत समिती जळगावचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी लक्ष्मण अभिमन पाटील (वय ५३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८:३९ वाजेच्या सुमारास जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल: १. संचालक – मे. जयकिसन बायोकेम फर्टिलायझर्स, बारामती (जि. पुणे) २. जयप्रकाश नारायण फडतरे (वय ४५, प्रॉडक्शन मॅनेजर, रा. एम.आय.डी.सी. बारामती, जि. पुणे)

दाखल कलमे: आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८(४) (फसवणूक), खत नियंत्रण आदेश १९८५ चे विविध कलमे (४, ५, ६, ९, ११, १२, १४, १५, १९-A, १९-B, २५(१) व ३५(१)A) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ मधील उपकलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे (गुन्हा रजि. नं. २२३/२०२६).

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून, ते स्वतः या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.


 

 

Previous Post

आभोडा बुद्रुक येथे ‘जाब विचारल्याच्या’ रागातून तरुणाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारला; रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

कुऱ्हा येथे चालकानेच केला १ लाखाचा ट्रॅक्टर अन् ट्रॉली लांबवून विश्वासघात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

कुऱ्हा येथे चालकानेच केला १ लाखाचा ट्रॅक्टर अन् ट्रॉली लांबवून विश्वासघात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना
Uncategorized

जळगावात भरधाव रिक्षाच्या धडकेत १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 9, 2026
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू
1xbet russia

भडगाव शहरात मद्यधुंद पिकअप चालकाचा थरार; रस्त्यावरील वाहनांना धडक देऊन केले नुकसान, आरोपीवर गुन्हा दाखल

August 9, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
Uncategorized

कुऱ्हा येथे चालकानेच केला १ लाखाचा ट्रॅक्टर अन् ट्रॉली लांबवून विश्वासघात; भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

जळगावात भरधाव रिक्षाच्या धडकेत १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी; अज्ञात चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 9, 2026
शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शहीदांचे बलिदान हा राष्ट्राच्या स्वाभिमानाचा अमूल्य ठेवा’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon