शिरसोलीतील बारी समाज माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक व सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन
शिरसोली (प्रतिनिधी) : बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने ‘सायबर सुरक्षा जनजागृती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्हे आणि ऑनलाइन फसवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.


या कार्यक्रमासाठी विद्यापीठातून जानवी सपकाळे, जय ठाकूर, अक्षय पाटील आणि राहुल चोपडे हे विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव, समाजमाध्यमांचा सुरक्षित वापर, मजबूत पासवर्डचे महत्त्व तसेच डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षा आणि डिजिटल व्यवहारांशी संबंधित विविध प्रश्न उपस्थित केले. उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी योग्य उत्तरे देत ऑनलाइन जगतात वावरताना आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. बदलत्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार आणि समाजमाध्यमांचा वापर करताना सतर्कता किती महत्त्वाची आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून झाली.









