जामनेर तालुक्यात मोबाईल टॉवरवरील वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

देवपिंप्री येथील टॉवरला चोरट्यांचा डल्ला; ४,८०० रुपयांचे नुकसान
जामनेर | प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील देवपिंप्री गावातील मोबाईल टॉवरवरील विद्युत वायर चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनाका रजि. क्र. १०२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याप्रकरणी अमोल चरणदास शिंदे (वय ३८, रा. खोटे नगर, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. घटना देवपिंप्री (ता. जामनेर) येथील इंडस टॉवर क्र. १२५०७७७ येथे घडली.
फिर्यादीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने टॉवरवरील सुमारे ४,८०० रुपयांची बॅटरी वायर व डीसीडीबी पॉवर प्लांटची वायर चोरून नेली. यामुळे टॉवरचे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार गणेश भावसार करीत आहेत.









