• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 28, 2026
in Uncategorized
0
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चाळीसगावमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
जळगाव, दि. २७ – : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हे राज्य शासनाचे प्रमुख ध्येय असून लोकांच्या गरजा ओळखून गुणवत्तापूर्ण विकासकामे राबविण्यात येत आहेत. चाळीसगावमध्ये आज झालेली विविध विकासकामे नागरिकांच्या कायम स्मरणात राहतील, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
चाळीसगाव शहर व तालुक्याच्या विकासाला चालना देणाऱ्या सुमारे ५८.९४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारत परिसरात आयोजित मुख्य लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री श्री पाटील बोलत होते.
यावेळी आमदार मंगेश चव्हाण, चाळीसगाव नगरपालिकेच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, सहायक जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी मंदार कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे, तसेच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन लोकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या व्यक्तींचे समाज कौतुक करतो. शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्यामुळे राज्यभर विकासकामांना गती मिळाली आहे. धरणगाव तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांमुळे तेथील पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर झाली असून अशाच प्रकारे सर्व भागांचा विकास करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, चाळीसगाव तालुक्याच्या विकासासाठी शासनाने वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर विकासकामे साकार झाली आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांच्या दूरदृष्टी आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामे शक्य झाली. शेतकरी समृद्ध होणे ही शासनाची प्राथमिकता असून त्यांच्या हितासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. चाळीसगावच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य कायम राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नागरिकांच्या सहकार्यामुळे शहर व तालुक्यात अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्ण होत आहेत. आगामी काळात चाळीसगावमध्ये जिल्हास्तरीय विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तालुक्याच्या प्रगतीसाठी शेतकरी समृद्ध होणे आवश्यक असून पुढील दोन महिन्यांत सात बंधाऱ्यांच्या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तालुक्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्यासह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले.
यावेळी नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारत, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत, रायगड व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृह, प्रांताधिकारी कार्यालय व निवासस्थान, नोंदणी सेवा तीर्थ, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, ग्रामीण रुग्णालय कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तसेच नवीन टाकळी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आदी विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रशांत पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. सुपे, तहसीलदार प्रशांत पाटील, विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

 

Previous Post

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026
भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon