जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील जुने बसस्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या वाईन शॉप परिसरात हातात धारदार कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. ही घटना २१ जुलै रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार नंदलाल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून धारदार कोयता जप्त करण्यात आला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहेत.









