वृक्षलागवड, जलव्यवस्थापन आणि ’माझे शहर माझी जबाबदारी’ अभियानाला मिळणार बळ
जळगाव, (प्रतिनिधी ) – जळगावातील ख्यातनाम अस्थिरोगतज्ज्ञ व इंडियन मेडिकल असोसिएशन (खचअ) चे सक्रिय सदस्य डॉ. नितीन धांडे यांनी नुकतीच पद्मश्री चैतराम पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान वृक्षलागवड, जलव्यवस्थापन आणि समाजाच्या सहभागातून पर्यावरण संवर्धन या विषयांवर सविस्तर व मनमोकळी चर्चा झाली.
डॉ. नितीन धांडे यांनी पद्मश्री पवार यांना जळगावमध्ये सुरू असलेल्या ’माझे शहर माझी जबाबदारी’ या लोकसहभागातून राबविण्यात येणार्या अभियानाची माहिती दिली. या अभियानामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन (खचअ) सक्रियपणे सहभागी असून शहर स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक उत्तरदायित्व वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ. धांडे यांनी या अभियानाला समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. डॉक्टर, उद्योजक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, युवक तसेच विविध क्षेत्रातील नागरिक या अभियानाशी जोडले जात असून, शहराच्या विकासासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.पद्मश्री चैतराम पवार यांनी वृक्षलागवड आणि जलव्यवस्थापन ही भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची क्षेत्रे असल्याचे सांगत लोकसहभागातूनच शाश्वत विकास साध्य होऊ शकतो, असे मत व्यक्त केले. पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि जनजागृती आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.ही भेट अत्यंत समाधानकारक आणि प्रेरणादायी ठरल्याची भावना डॉ. नितीन धांडे यांनी व्यक्त केली. समाजहित, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यामुळे ’माझे शहर माझी जबाबदारी’ अभियान अधिक प्रभावी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.