• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 12, 2026
in Uncategorized, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मैत्रीचा विश्वासघात; मित्रानेच घेतला मित्राचा जीव

कथित अनैतिक संबंधांच्या वादातून गळा आवळून हत्या;रावेर पोलिसांनी केला खुनाचा उलगडा

रावेर (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील नांदूरखेडा शिवारात शेतात आढळलेल्या ३० वर्षीय मजुराच्या मृत्यूचे गूढ रावेर पोलिसांनी उलगडले असून, अनैतिक संबंधांच्या वादातून दोन मित्रांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली असून मुख्य संशयिताचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शेख कुरबान शेख शब्बीर (वय ३०) हा ९ जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता होता. ११ जुलै रोजी सकाळी नांदूरखेडा शिवारातील कपाशीच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तपासाची दिशा बदलली.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित गणेश संजय घोरपडे याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. एप्रिल २०२६ मध्ये ऐनपूर येथे दोघांना रंगेहात पकडल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली होती. त्या घटनेचा राग मनात धरून त्याने मयताला “तू आमच्या संबंधांमध्ये आला तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे तपासात समोर आले आहे.

९ जुलैच्या रात्री गणेश घोरपडे व मेघराज वसंत सांगळे यांनी मयताला दारू पाजून मोटारसायकलवरून नांदूरखेडा शिवारात नेले. तेथे हाताने गळा आवळून त्याची हत्या केली आणि मृतदेह कपाशीच्या शेतात टाकून दोघे पसार झाले, असा पोलिसांचा प्राथमिक तपास आहे.

मयताचा भाऊ शेख सलमान शेख शब्बीर (रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४३/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणात मेघराज वसंत सांगळे याला अटक करण्यात आली असून मुख्य संशयित गणेश संजय घोरपडे याला सागवानी तहसील – जयशिनगर जिल्हा सागर मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदिप पाटील व पोलीस उपनिरीक्षक तुषार सुधाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, रावेर पोलिसांनी वेगवान तपास करून खुनाचे गूढ उकलल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.


 

 

Previous Post

जळगाव ते पंढरपूर सायकल वारी यशस्वी : ४८५ किमीचा प्रवास पूर्ण ; महापौर दीपमाला काळे सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल चरणी दाखल

Next Post

शेतातील गोठ्यातून जनावरे चोरी; ४३ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

शेतातील गोठ्यातून जनावरे चोरी; ४३ हजारांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा जाळ्यात; एक अटकेत, एक पसार
1xbet russia

ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा जाळ्यात; एक अटकेत, एक पसार

August 28, 2026
सावदा येथे ५ लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक
1xbet russia

सावदा येथे ५ लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

August 28, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

मुक्ताईनगरमध्ये १३ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले

August 28, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

शाहूनगरमध्ये व्यक्तीच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची चोरी

August 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा जाळ्यात; एक अटकेत, एक पसार

ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा जाळ्यात; एक अटकेत, एक पसार

August 28, 2026
सावदा येथे ५ लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

सावदा येथे ५ लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक

August 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon