• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमळनेरजवळ बसला भरधाव मोटारसायकलची धडक; अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

दहिंवद गावानजीकची घटना; निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकारणी दुचाकीस्वारावरच गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी): तालुक्यातील दहिंवद गावाजवळ जळगाव-गांधली मार्गावर चालणाऱ्या एका एसटी बसला समोरून येणाऱ्या भरधाव मोटारसायकलने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला जाऊन गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी बस चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ जुलै २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास एसटी बस (क्रमांक MH 14 BT 2319) ही जळगाव बस स्थानकावरून अमळनेर तालुक्यातील गांधली येथे मुक्कामासाठी जाण्यास निघाली होती. दहिंवद गावाजवळील आश्रमशाळेजवळ बस चालकाने आपले वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूने नियंत्रित वेगात चालवले होते. त्याच वेळी समोरून एक अज्ञात चालक त्याच्या ताब्यातील ‘हिरो’ कंपनीची ‘एच.एफ. डिलक्स’ मोटारसायकल (क्रमांक MH 18 BS 4768) अत्यंत भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत आला. त्याने थेट बसच्या मागील बाजूच्या टायरजवळ जोरात धडक दिली.

धडक बसताच मोठा आवाज झाल्याने बस चालक विजय पाटील यांनी गाडी थांबवून खाली उतरून पाहिले. त्यावेळी मोटारसायकलस्वार रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत पडलेला दिसला आणि त्याची दुचाकीही बाजूला पडलेली होती. जखमी दुचाकीस्वाराने स्वतःच्या मोबाईलवरून नातेवाईकांना फोन केला, त्यानंतर थोड्याच वेळात तिथे आलेल्या एका चारचाकी वाहनातून त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातग्रस्त दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात लावली आहेत.

या अपघातप्रकरणी एसटी महामंडळाचे बस चालक फिर्यादी विजय बळीराम पाटील (वय ५५, रा. पिळोदे, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांनी ७ जुलै रोजी दुपारी २:४३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्यांच्या फिर्यादीवरून मोटारसायकल चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा रजि. नं. ३४९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम २८१, १२५(अ), (ब), ३२४(४) सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात ‘ई-साक्ष’ प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील पुढील तपास करत आहेत.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Next Post

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
क्राईम

शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 15, 2026
वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय मार्गाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन
खान्देश

वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय मार्गाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन

October 15, 2026
जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात
क्राईम

जळगावच्या आकाशवाणी उड्डाणपुलावर भीषण अपघात

October 15, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 15, 2026
वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय मार्गाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन

वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय मार्गाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन

October 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon