• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रावेर तालुक्यातील अजंदा रेल्वे पुलाजवळची रस्ता लूट उघड; २४ तासांत ३ आरोपींना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 6, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रावेर तालुक्यातील अजंदा रेल्वे पुलाजवळची रस्ता लूट उघड; २४ तासांत ३ आरोपींना अटक

मजूर देण्याच्या बहाण्याने बोलावून चाकूच्या धाकाने लुटले; रावेर पोलिसांची धडक कारवाई

रावेर (प्रतिनिधी): रावेर तालुक्यातील अजंदा गावाजवळील रेल्वे पुलाजवळ बांधकाम ठेकेदाराला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

मजूर पुरवण्याच्या बहाण्याने रचला सापळा

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनावल (ता. रावेर) येथील रहिवासी असलेले बांधकाम ठेकेदार शेख जाबीर शेख अमान (वय ४१) यांना कामासाठी नेहमी मजुरांची गरज भासते. हीच बाब हेरून आरोपी शेख मुस्तकीम शेख अकील याने ४ जुलै २०२६ रोजी ठेकेदाराला फोन करून ‘मी तुम्हाला दोन मजूर मिळवून देतो’ असे आश्वासन दिले.

दुसऱ्या दिवशी ५ जुलै रोजी मजुरांबाबत विचारणा केली असता, मुस्तकीमने त्यांना विवरा येथे बोलावून घेतले. “मजूर अजंदा गावी कामासाठी गेले आहेत, आपण तिथे जाऊन त्यांना भेटू”, अशी बतावणी करून मुस्तकीम ठेकेदाराला अजंदा रेल्वे पुलाजवळ घेऊन गेला.

चाकूचा धाक दाखवून ऑनलाईन लुटले

अजंदा रेल्वे पुलाजवळ पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हा गाडीजवळ आधीच दोघे जण उभे होते. मुस्तकीमने ‘हेच ते मजूर आहेत’ असे सांगून ठेकेदाराला विश्वासात घेतले आणि रोजंदारीची बोलणी करण्यासाठी शेतात बोलावले. शेतात जाताच एका आरोपीने शेख जाबीर यांच्या गळ्यावर चाकू ठेवून पैशांची मागणी केली. ठेकेदाराच्या खिशात केवळ ५०० रुपये होते, ते आरोपींनी काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि जबरदस्तीने ‘फोन पे’चा (PhonePe) पिन क्रमांक विचारून वेगवेगळ्या खात्यांवर तब्बल ८ हजार रुपये ऑनलाईन वळवून घेतले व घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रात्रीची वेळ, अंधुक फुटेज आणि पोलिसांचा सुगावा

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अजंदा परिसरातील व शिवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. मात्र, घटना रात्रीची असल्याने आरोपींचे चेहरे अस्पष्ट येत होते. दरम्यान, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना आरोपींच्या दुचाकीबाबत गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे रावेर पोलिसांच्या डीबी (गुन्हे शोध) पथकाने खातरजमा केली असता, संशयित मुस्तकीम याने गुन्ह्याची कबुली दिली.

‘हे’ आहेत अटक केलेले आरोपी:

१) शेख मुस्तकीम शेख अकील (वय २२, रा. फतेह नगर, रावेर) २) शेख मोईन शेख नईम (वय १९, रा. खिर्डी रोड, विवरा) ३) फैजल बेग हिदायत बेग (वय १९, रा. शंकर प्लॉट, रावेर)

पोलिसांनी या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (क्र. MH 19 ED 5580) आणि मोबाईल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी शेख मोईन शेख नईम हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात एका वृद्ध व्यक्तीला अशाच प्रकारे लुटल्याचा गुन्हा दाखल आहे.

आरोपींना पोलीस कोठडी; अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता

अटक करण्यात आलेल्या आरोपींना माननीय न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ०९/०७/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीकडून आणखीही काही लुटीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

सदरची यशस्वी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेरचे पो.नि. संदीप पाटील, पोउपनि मनोज महाजन, पोउपनि तुषार पाटील, तसेच डीबी पथकाचे समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण आणि सुकेश तडवी यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.


 

 

Tags: #raver crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

फुलगावात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा डिजिटल वॉच; सायबर पॅट्रोलिंगद्वारे विशेष मोहीम सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा डिजिटल वॉच; सायबर पॅट्रोलिंगद्वारे विशेष मोहीम सुरू

आक्षेपार्ह रील्सवर जळगाव पोलिसांचा डिजिटल वॉच; सायबर पॅट्रोलिंगद्वारे विशेष मोहीम सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
क्राईम

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास
क्राईम

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत
क्राईम

यावल तालुक्यात दिव्यांग व्यक्तीला विहिरीत उलटे लटकवून मारहाण; दोघे अटकेत

October 5, 2026
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान
खान्देश

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रदेश तेली समाजातर्फे सन्मान

October 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

जळगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत ४२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

October 5, 2026
जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगावात ७४ वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घरफोडी; २१ हजारांचा मुद्देमाल लंपास

October 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon