मुलाला शाळेत सोडून परतताना अपघात; वाहनचालकाविरुद्ध गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी): –शिरसोली रस्त्यावर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने रविकुमार वासुदेव राजपाल (वय ४०, रा. कंवरनगर, सिंधी कॉलनी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
रविकुमार राजपाल हे मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना गणपती नगराजवळ मागून आलेल्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, हाताला, कमरेला आणि पायाला दुखापत झाली. याप्रकरणी वाहनचालक दीपक रमेश चेतवाणी (रा. सिंधी कॉलनी) याच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











