जळगाव (प्रतिनिधी): – जळगाव शहरात खरे सोन्याचे दागिने घेऊन त्याबदल्यात चांदीवर सोन्याचा मुलामा दिलेले बनावट तुकडे देत ६ लाख १९ हजार १०२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दिलीप खेतमल लुनिया (वय ५५, व्यवसाय – सराफी, रा. पारीखवाडी, गणपती नगर, जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २३ जून २०२६ रोजी सकाळी ११.२३ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान प्रकाश मेडिकलजवळ, बाबा वडापाव दुकानाशेजारी हा प्रकार घडला.
तक्रारीनुसार, महेश वर्मा (मोबाईल क्रमांक 8849746428) आणि राजेश (मोबाईल क्रमांक 9638676428, पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांनी ३९.६६० ग्रॅम वजनाचे चांदीवर सोन्याचा मुलामा दिलेले बनावट तुकडे देऊन त्याबदल्यात खरे सोन्याचे दागिने घेतले. या व्यवहारातून दिलीप लुनिया यांची ६ लाख १९ हजार १०२ रुपयांची फसवणूक करण्यात आली.
याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. सतीश पाटील करीत आहेत.









