जळगाव ( प्रतिनिधी) –कोव्हिडं 19 या संसर्गजन्य आजाराचे निर्मूलनासाठी लिग्रॅण्ड कंपनीतर्फे मास्क व सॅनिटायजर चे शासनास सहाय्य करणेत आले यामध्ये एकूण नोज मास्क – दहा हजार सॅनिटायजर बॉटल – एक हजार असून सदरचे साहित्य मा.जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, मा.अध्यक्ष, जात पडताळणी समिती, गोरक्षनाथ गाडीलकर, मा.अप्पर जिल्हाधिकारी – प्रवीण महाजन, मा.निवासी उपजिल्हाधिकारी – राहुल पाटील, जळगाव च्या प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये लिग्रॅण्ड कंपनीचे उपव्यवस्थापक श्री प्रमोद परुळेकर, मानव संसाधन प्रमुख श्री.समीर दाभाळकर यांचे हस्ते सुपूर्द करणेत आले आहे. लिग्रॅण्ड कंपनी मार्फत वेळोवेळी सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते.








