जळगाव ( प्रतिनिधी) – शहरातील नेहरू नगरात असलेल्या दत्त मंदिराजवळ बंद घरातून चोरट्यांनी 68 हजारांचा मुद्दे माल चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली असुन भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


शहरातील नेहरू नगर परिसरात कंन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले होते.मात्र हा झोन हटविल्यानंतर 12 जुन रोजी फिर्यादी हेमंत भंगाळे (वय 31) हे पत्नी व मुलासह जामनेर तालुक्यातील नेरी येथे गेले असता घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतील कपाटातील रोख रक्कम 40 हजार , 18 हजार कीमतीच्या, प्रत्येकी 3 ग्रँम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या,10 हजार रुपये कीमतीची 5 ग्रँम वजनाची सोन्याची चैन अस एकुण 68 हजार रुपये कीमतीचा मुद्दे माल चोरट्यांनी चोरुन नेला याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला हेमंत भंगाळे यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे


दरम्यान फिर्यादीची पत्नी ह्या बाहेर गावाला असल्यामुळे त्यांना कपाटात किती रुपयांचा मुद्देमाल आहे.याबाबत उद्या त्याचा जबाब घेण्यात येणार असल्याचे समजते.







