• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आंतरजिल्हा शस्त्रतस्कर टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आंतरजिल्हा शस्त्रतस्कर टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

एलसीबी आणि चोपडा शहर पोलिसांची संयुक्त कारवाई; गावठी कट्टा, मॅगझिन, कारसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव (प्रतिनिधी) :- स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) चोपडा शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची वाहतूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी कट्टा, दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि एक कार असा सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. १ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, काही संशयित व्यक्ती Hyundai EON कारमधून विनापरवाना गावठी कट्टा घेऊन लासूर-चुंचाळे मार्गे चोपडा शहराच्या दिशेने येत आहेत.

माहितीची खातरजमा झाल्यानंतर एलसीबी आणि चोपडा शहर पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. या पथकाने चोपडा-लासूर-चुंचाळे मार्गावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचला. सायंकाळी सुमारे ७.३० वाजता संशयित Hyundai EON (एमएच-२० ईई-६१०३) कार अडवून पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान कारच्या मागील सीटखाली मॅगझिनसह एक गावठी कट्टा आणि एक अतिरिक्त मॅगझिन आढळून आले. आरोपींच्या अंगझडतीत तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.

या कारवाईत ज्ञानेश्वर रामकृष्ण माळी (वय ३९, रा. कुन्हाड खुर्द, ता. पाचोरा), सचिन रोशन पवार (वय ३४, रा. मयूर पार्क कॉलनी, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि अनिल कचरे साळुंखे (वय ३७, रा. जाधव गल्ली, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात सुमारे ६० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व मॅगझिन, १० हजार रुपयांचे अतिरिक्त मॅगझिन, ५ लाख रुपये किमतीची Hyundai EON कार तसेच ३० हजार रुपये किमतीचे Oppo, Vivo आणि Redmi कंपनीचे तीन मोबाईल फोन यांचा समावेश आहे.

या टोळीचे इतर कोणाशी संबंध आहेत का आणि शस्त्रास्त्रांची वाहतूक नेमकी कोणासाठी केली जात होती, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, दीपक माळी, रविंद्र पाटील, विष्णू बिन्हाडे, रावसाहेब पाटील तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, युवराज बाकुंज आणि इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

उसाच्या पैशांच्या वादातून अपहरण; मारहाण करून जबरदस्तीने चेकवर घेतल्या सह्या

Next Post

पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात

पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
1xbet russia

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

July 3, 2026
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद
1xbet russia

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

July 3, 2026
ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात
1xbet russia

ई-बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; फोमच्या सहाय्याने २० मिनिटांत आटोक्यात

July 3, 2026
पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात
1xbet russia

पहाटे एलसीबीची धडक; अमळनेरात गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटवर छापा, ११ जण ताब्यात

July 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

रेशन दुकानाविरोधात काँग्रेसचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

July 3, 2026
जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

जामनेरमध्ये १३ लाखांच्या घरफोडीचा उलगडा; तीन आरोपी जेरबंद

July 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon