फैजपूर (प्रतिनिधी):- शहरात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. घरी एकट्या असलेल्या एका ७० वर्षीय वृद्धेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी फैजपूर पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. रवी चव्हाण (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या संशयित नराधमाचे नाव आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, २९ जून रोजी पीडित ७० वर्षीय वृद्धा आपल्या घरी एकट्याच होत्या. याचाच गैरफायदा घेत आरोपी रवी चव्हाण याने त्यांच्या घरात प्रवेश केला. वृद्धेकडे पाणी मागितल्यानंतर, पाणी देत असतानाच आरोपीने त्यांना जीवे मारण्याची गंभीर धमकी दिली आणि त्यांच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या धक्कादायक प्रसंगानंतर घाबरलेल्या पीडितेने धीर धरत ३० जून रोजी फैजपूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली.
घटनेचे गांभीर्य ओळखून फैजपूर पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. गुन्ह्याची माहिती मिळाल्यापासून अवघ्या दोन तासांच्या आत पोलिसांनी शोधमोहीम राबवून संशयित आरोपी रवी चव्हाण याला जेरबंद केले. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे फैजपूर शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.