• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रलंबित विकासकामांवर तातडीने गती द्या – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
लवकरच आषाढी एकादशीसाठी रेल्वे सुरु होणार -ना. रक्षाताई खडसे

नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यावर भर ; ‘दिशा’ समितीच्या बैठकीत विकासकामांचा आढावा

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांना गती देत सर्व प्रलंबित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री तथा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) अध्यक्षा रक्षा खडसे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित ‘दिशा’ समितीच्या बैठकीत त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सहभागी झाले. सभागृहात महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, उपवनसंरक्षक सौरभ सहाय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अमृत योजना, वीजपुरवठा आणि केबल चोरीवर भर

जलसंपदा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अमृत योजनेतील प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. महावितरणच्या वीजवाहिन्यांच्या केबल चोरीच्या वाढत्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देश देत, भारनियमनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दररोज किमान पाच तास नियमित वीजपुरवठा मिळावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले.

पीक विमा योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना वेळेत मिळण्यासाठी कृषी व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता रक्षा खडसे यांनी अधोरेखित केली. योजनांच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई होऊ नये, यासाठी विभागांनी सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्याचे निर्देश

बैठकीत कृषी, नगरपालिका प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग, पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रामीण व शहरी रस्ते, बँकिंग सुविधा, कर्जवाटप, वृक्षारोपण तसेच विविध पायाभूत सुविधांशी संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संभाजीनगर–जळगाव राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील विविध प्रलंबित रस्ते प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश देण्यात आले.

विविध केंद्रीय योजनांचा आढावा

यावेळी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अटल भूजल योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, क्रीडा विभागाच्या योजना, दूरसंचार सुविधा, वन विभागाच्या वृक्षारोपण मोहिमा तसेच रेल्वे प्रकल्पांसाठीच्या भूसंपादन कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांचे तातडीने निराकरण करून शासनाच्या योजनांचा लाभ अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.


 

 

Tags: rajyamantri rkashatai khadse news
Previous Post

फैजपुरात माणुसकीला काळिमा; ७५ वर्षीय वृद्धेवर अत्याचार

Next Post

वेग, तत्परता आणि विश्वास… डायल ११२ सेवेत जळगाव पोलिसांची अव्वल झेप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वेग, तत्परता आणि विश्वास… डायल ११२ सेवेत जळगाव पोलिसांची अव्वल झेप

वेग, तत्परता आणि विश्वास... डायल ११२ सेवेत जळगाव पोलिसांची अव्वल झेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
1xbet russia

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

July 1, 2026
 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न
1xbet russia

 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

July 1, 2026
बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
1xbet russia

बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाचा १८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

July 1, 2026
डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश
1xbet russia

डॉक्टर्स डे निमित्त वैद्यकीय नैतिकतेचा विद्यार्थ्यांना संदेश

July 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

July 1, 2026
 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

 आर के पाटील राज्य उपाध्यक्ष म. एस टी कामगार सेना सेवानिवृत्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न

July 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon