जळगाव ;- जिल्हा मनियार बिरादरी अध्यक्ष फारुक शेख यांनी न्यूज अठरा चे संपादक अमिष देवगण यांनी ख्वाजा गरीब नवाज चिस्ती यांच्याबाबत वापरलेले अपशब्द, केलेला अपमान व दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष जाऊन प्रथम माहिती अहवाल भारतीय दंड विधान कायदा २९५(अ)१५३(अ) ३४, १२०(ब) व ५०५(२) प्रमाणे दाखल केलेला आहे.
पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी याप्रकरणी वरिष्ठांशी चर्चा करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी फारुक शेख सोबत रजा मस्जिद चे आलीम नजमूलहक मिसबाही ,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मझर खान ,इदगाह ट्रस्ट चे ताहेर शेख इब्राहिम, बागवान बिरादरीचे सईद अब्दुल रशिद, इस्लामिक युथ फेडरेशनचे उमर शेख ,अक्सा बॉईज चे एडव्होकेट अमीर शेख, जामा मस्जिद ट्रस्टचे सलीम मोहम्मद व तय्यब शेख, शाहूनगर चे नजमुद्दिन जैनुद्दीन व रफिक शब्बीर शेख ,शिकलगार बिरादरीचे अन्वर खान व अजीज खान यांची उपस्थिती होती.

भारतीय जवानांना श्रद्धांजली
सर्वप्रथम जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी ने एल ए सी जवळ चीन ने केलेल्या भ्याड हल्ल्यात जे आमचे सैनिक मारले गेले त्यांना श्रद्धांजली अर्पण करून चिन चा निषेध करण्यात आला. चीनचे ध्वज सुद्धा यावेळी फाडण्यात आले.
बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी चीनच्या या कारवाईचा निषेध म्हणून आपण चिनी वस्तूवर बहिष्कार टाकावा असे आवाहन सुद्धा केले आहे.







