पाचोरा – पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा पि.जे.रेल्वेच्या मोठ्या पुलाकडे जाणाऱ्या मार्गा जवळील शेताजवळ एका ३५ वर्षीय पुरूष व ३० वर्षीय महिलने कीटकनाशके औषधे प्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.


दि.१७ जून बुधवार रोजी दुपारी एक वाजेपुर्वी गोराडखेडा पि.जे. रेल्वे गेट पासून मोठ्या रेल्वे पुलाकडे जाणाऱ्या मार्गावरील शंभर मीटर अंतराच्या अलीकडे ३५ वर्षीय उमेश हरी शेळके वय अंदाजे ३५ व ३० वर्षीय पिंकी (पुर्ण नाव माहित नाही) या दोघांनी शेतीसाठी वापरले जाणारे विषारी किटक नाशक औषधी घेऊन आत्महत्या केल्याचे जवळील एका शेतकऱ्याला दिसून आले. घटनेची माहिती गोराडखेडा येथील माजी सरपंच मनोज अप्पा पाटील व संजय पोलिस पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी घटनेची माहिती पाचोरा पोलिसांना कळवली. मयतांच्या गळ्यात झेंडूच्या फुलाच्या माळा होत्या, बाजुला किटक नाशक औषधीचा डब्बा व प्लास्टिकचे डिसपोजल ग्लास पडलेले होते.मयत पुरुष व महिला राहणार घाणेगाव तालुका सोयगाव जि.औरंगाबाद येथील असल्याचे मयत इसमाच्या पाचोरा येथील एक महिला नातेवाईकांकडून माहिती मिळाली आहे. दोघ मयतांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. मयत पुरूष हा शेतीकाम करीत असल्याचे व विवाहीत असल्याचे कळते. आत्महत्येचे कारण पोलिस चौकशीत निष्पन्न होणार आहे.







