धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पष्टाणे बुद्रुक येथील 32 वर्षीय युवकाचा शेतातील विहिरीत पडून बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर संतोष पाटील (वय 32, रा. पष्टाणे बुद्रुक, ता. धरणगाव) हे त्यांच्या मालकीच्या शेतात गेले होते. दरम्यान, शेतातील विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर त्यांना तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.









