• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जुन्या वादातून तरुणाचा बळी; बेदम मारहाणीनंतर २६ वर्षीय युवकाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

भुसावळात सहा संशयितांविरोधात खुनाचे वाढीव कलम लावण्याची पोलिसांची तयारी

भुसावळ, (प्रतिनिधी)- शहरातील व्हीआयपीसीटी कॉलनी परिसरात जुन्या वादातून झालेल्या बेदम मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय तरुणाचा मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून आता संबंधित सहा संशयितांविरोधात खुनाचे कलम वाढविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मृत तरुणाचे नाव मंगेश अंबादास काळे (वय २६, रा. भुसावळ) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश काळे हा पत्नी पायल यांच्यासह व्हीआयपीसीटी कॉलनी परिसरात वास्तव्यास होता. २९ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजेच्या सुमारास तो घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेला असता सहा जणांचे टोळके तेथे पोहोचले. जुन्या वादाच्या कारणावरून संशयितांनी त्याच्यावर लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली.

जीव वाचवण्यासाठी मंगेशने गच्चीवरून उडी घेतली. मात्र संशयितांनी त्याचा पाठलाग करून पुन्हा मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली.

मारहाण सुरू असताना मंगेशची पत्नी मदतीसाठी खाली आली असता एका संशयिताने पिस्टल दाखवत तिला धमकावल्याचा आरोप आहे. कुणालाही फोन केल्यास गोळी घालण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान, ११२ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार झाले.

गंभीर जखमी झालेल्या मंगेश काळे यांना प्रथम जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना १ जून रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पथक मुंबईला रवाना केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

या प्रकरणात यापूर्वीच कुंदन पठाडे, रोहित नवगिरे उर्फ दादू, विशाल गेंगाट, बाबा गेंगाट, अंकित आणि भावेश (सर्व रा. भुसावळ) यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता जखमी तरुणाचा मृत्यू झाल्याने संबंधित गुन्ह्यात खुनाचे कलम समाविष्ट करण्यात येणार आहे.

घटनेनंतर भुसावळ शहरात हळहळ व्यक्त होत असून, आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून फरार संशयितांचा शोध सुरू असून पुढील तपास वेगाने करण्यात येत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जळगाव पोलिसांचा पुढाकार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

जुन्या वादातून तरुणाचा बळी; बेदम मारहाणीनंतर २६ वर्षीय युवकाचा मृत्यू

June 2, 2026
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जळगाव पोलिसांचा पुढाकार
1xbet russia

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जळगाव पोलिसांचा पुढाकार

June 2, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन
जैन कंपनी

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी

जुन्या वादातून तरुणाचा बळी; बेदम मारहाणीनंतर २६ वर्षीय युवकाचा मृत्यू

June 2, 2026
ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जळगाव पोलिसांचा पुढाकार

ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जळगाव पोलिसांचा पुढाकार

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon