• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 2, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या टीमचे यश

जळगाव (प्रतिनिधी) : अमळनेर येथील अवघ्या तीन महिन्यांच्या बालिकेवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून तिचे प्राण वाचविले आहेत. गंभीर अवस्थेत व्हेंटीलेटरवर दाखल करण्यात आलेल्या या शिशुला दहा दिवसांच्या अथक उपचारांनंतर नवजीवन मिळाले असून सध्या तिची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आहे.
याबाबत माहिती अशी की, अमळनेर येथील मोनीस हारून शेख यांच्या तीन महिन्यांच्या बालिकेला काही दिवसांपासून तीव्र ताप येत होता. त्यासोबतच तिला वारंवार झटके येण्यास सुरुवात झाली. प्रकृती बिघडत असल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने धुळे येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे तिची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर (व्हेंटीलेटर) ठेवण्यात आले. मात्र प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने आणि अधिक प्रगत उपचारांची आवश्यकता असल्याने तिला हायर सेंटर असलेल्या डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात दाखल होताच एनआयसीयू व पीआयसीयू  विभागातील तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार, डॉ. उमाकांत अणेकर यांनी बालिकेची सखोल तपासणी सुरू केली. बालिकेच्या पाठीतील पाणी तपासणी, मेंदूचा एमआरआय तसेच विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांच्या आधारे बालिकेला ‘एनसेफेलायटीस’ (मेंदूची सूज) हा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. निदान स्पष्ट झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ओमश्री गुडे, डॉ. कुशल धांडे, डॉ. विशाल कोठावडे, डॉ. नवेद खान, डॉ. मिमोनी कुंभारे, डॉ. सृष्टी भिरूड, डॉ. अस्मिता गायकवाड, डॉ. निशीगंधा सोनवणे, डॉ. भारती झोेपे या टीमने तत्काळ उपचार पद्धतीत बदल करून प्रतिबंधात्मक औषधांचा डोस वाढविला. बालरोगतज्ज्ञ, अतिदक्षता विभागातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ यांनी सातत्याने बालिकेवर लक्ष ठेवत उपचार सुरू ठेवले. उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत गेल्याने बालिकेची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. दहा दिवसांच्या उपचारांनंतर तिला व्हेंटीलेटरमधून बाहेर काढण्यात आले आणि अखेर तिची प्रकृती पूर्णपणे धोक्याबाहेर आली.विशेष म्हणजे या बालिकेवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्यात आले. त्यामुळे कुटुंबीयांना कोणताही आर्थिक भार सहन करावा लागला नाही. गंभीर अवस्थेतील शिशुला वेळेवर योग्य निदान आणि अत्याधुनिक उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचविणे शक्य झाले. पीआयसीयू विभागातील हिरामण लांडगे यांनीही कागदपत्राच्या पूर्ततेसाठी सहकार्य केले.

बालिका आमच्याकडे अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. तिला ताप आणि झटक्यांसह श्वसनाचा त्रासही होता. आवश्यक तपासण्यांमधून एनसेफेलायटीसचे निदान झाल्यानंतर त्वरित उपचार सुरू करण्यात आले. आमच्या एनआयसीयू व पीआयसीयू टीमच्या समन्वित प्रयत्नांमुळे बालिकेची प्रकृती सुधारली आणि तिला नवजीवन देता आले. लहान मुलांमध्ये तापासोबत झटके किंवा असामान्य लक्षणे दिसल्यास पालकांनी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

– डॉ. नवेद खान,

डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

उन्हात तहानलेल्या मुक्या जीवांसाठी मदतीचा हात

Next Post

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर
1xbet russia

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान
1xbet russia

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास
1xbet russia

घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लंपास

June 2, 2026
बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न
1xbet russia

बार्कलेज लाइफ स्किल ट्रेनिंग अंतर्गत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम संपन्न

June 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्र देशात टॉपर

June 2, 2026
शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

शेतातील ठिबक सिंचन संचाची तोडफोड; तीन लाखांचे नुकसान

June 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon