• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 18, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

जळगाव, (प्रतिनिधी) :-जी. एच. रायसोनी एज्युकेशनतर्फे आयोजित ‘थीम-आधारित ओपन पेंटिंग स्पर्धे’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविध्यालयात दि. १७ मे रोजी स्पर्धेचे पुन्हा आयोजन उत्साहात करण्यात आले. यावेळी स्पर्धकांसाठी “फ्युजन थीम (एनी फॉर्म ऑफ ट्रेडिशनल पेंटिंग सच ॲज फड, वारली, मधुबनी इत्यादी विथ फ्युजन ऑफ कंटेम्पररी फॉर्म)”हा विशेष विषय देण्यात आला होता. सकाळी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आकर्षक कलाकृती साकारल्या.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वारली, मधुबनी, फड यांसारख्या पारंपरिक चित्रशैलींना आधुनिक संकल्पनांची जोड देत कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि सामाजिक भान यांचे प्रभावी दर्शन घडवले. विविध विषयांवरील चित्रांमधून संस्कृती, परंपरा आणि आधुनिक जीवनशैली यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक कलेची ओळख तर झालीच, शिवाय त्यातून नव्या विचारांना अभिव्यक्त होण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध झाले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचे ऍडमिशन डीन प्रा. रफिक शेख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अरुण पाटील होते. तसेच मानव संसाधन विभाग प्रमुख मयूर गोपाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून चित्रकला शिक्षक दत्तात्रय गंधे व देवेंद्र कोल्हे यांनी काम पाहिले.स्पर्धेत ८ ते १३, १३ ते २१ आणि २१ वर्षांवरील अशा तीन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ३००० ते ७००० असे एकूण ३७००० पर्यंत रोख पारितोषिके देण्यात आली. तसेच प्रत्येक गटात प्रोत्साहनपर पारितोषिकेही प्रदान करण्यात आली.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अविनाश डी. काटे (डीन व प्राध्यापक, सॅमवेद स्कूल ऑफ आर्ट, म्युझिक, व्हिज्युअलायझेशन, एंटरटेनमेंट अँड डिझाइन, जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे), डॉ. मृणालिनी एस. नाईक (प्रोजेक्ट डायरेक्टर), डॉ. कृणाल महाजन, सागर पाटील, योगेश सोनार तसेच मोहन गोमासे यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुखाने चित्र रंगवत राशी पाटीलने जिंकली मने

या स्पर्धेतील सर्वांत प्रेरणादायी क्षण म्हणजे हाताने व पायाने इनॲक्टिव्ह असलेली विद्यार्थिनी राशी प्रवीण पाटील हिचा सहभाग ठरला. राशीने आपल्या मुखाच्या सहाय्याने सुंदर चित्र रंगवत स्पर्धेत प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. तिची जिद्द, आत्मविश्वास आणि कलाप्रेम पाहून उपस्थित विद्यार्थी व पालक भारावून गेले. राशीची कलाकृती पाहण्यासाठी स्पर्धास्थळी सहभागी स्पर्धकांनी विशेष गर्दी केली होती. अनेक विद्यार्थ्यांनी तिच्याकडून प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण राशीने यावेळी सर्वांसमोर उभे केले.

स्पर्धेतील विजेते

प्रथम गट (वय वर्षे ०८ ते १३) –
प्रथम : अनघा श्रीकृष्ण वाघ,
द्वितीय : देवर्षी महेश बोरसे,
तृतीय : योजित मोहन गोमासे,
प्रथम उत्तेजनार्थ : अक्षिता प्रल्हाद पाटील,
द्वितीय उत्तेजनार्थ : देविका राजेश धूत.

द्वितीय गट (वय वर्षे १३ ते २१) –
प्रथम : अक्षय धनराज पाचपोळ,
द्वितीय : तेजस भीकन पवार,
तृतीय : सुकृती रेमभोटकर,
प्रथम उत्तेजनार्थ : प्रेक्षा योगेश तारकस,
द्वितीय उत्तेजनार्थ : रिया हेमंत तारकस.

तृतीय गट (वय वर्षे २१ पेक्षा पुढे) –
प्रथम : तांझिला ताहेर पिंजारी,
द्वितीय : कुणाल विष्णू जाधव,
तृतीय : नेहा विजय चौधरी,
प्रथम उत्तेजनार्थ : राशी प्रवीण पाटील,
द्वितीय उत्तेजनार्थ : शारदा प्रमोद जावळे.


 

 

Tags: g.h.raysoni opan penting spardha news
Previous Post

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा
1xbet russia

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon