चोपडा (प्रतिनिधी):- चोपडा तालुक्यात ट्रॅक्टर पलटी झाल्याने २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पठाण मनसाराम भुगवाडे (वय २०, रा. कालिकुंडी, जि. बडवानी, मध्यप्रदेश) हा तरुण गोरगावले बुद्रुक परिसरात ट्रॅक्टरजवळ काम करत असताना ट्रॅक्टर पलटी झाला. यात तो गंभीर जखमी झाला होता.
नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.