• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अपघातग्रस्त शेतकर्‍याच्या मेंदूतील गाठीवरील शस्त्रक्रियेमुळे वाचले प्राण

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश

जळगाव (प्रतिनिधी):- वेळेवर निदान आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचारांमुळे अपघातग्रस्त शेतकर्‍याचे प्राण वाचल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.
याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील शंकर महाजन (वय ५५), हे जळगाव तालुक्यातील शेतकरी शेतातून घरी परतत असताना बैलगाडीवरून पडल्याने गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार बसून ते बेशुद्ध अवस्थेत गेले. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी त्यांची तात्काळ प्राथमिक तपासणी केली. डॉक्टरांनी तातडीने सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. सीटी स्कॅन अहवालात मेंदूमध्ये रक्ताची गाठ तयार झाल्याचे स्पष्ट झाले. या स्थितीला वैद्यकीय भाषेत एक्स्ट्रा ड्युरल हिमॅटोमा असे म्हणतात, जी जीवघेणी ठरू शकते.रक्ताची गाठ मेंदूवर दाब निर्माण करत असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. विपूल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मयूर बर्‍हाटे, डॉ. श्रृती खंडागळे, डॉ. प्रितम दास, डॉ. शार्दुल, डॉ. कोमेश नेमाडे, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. शितल फेगडे, डॉ. मारीया यांच्या टीमने ‘क्रेनीओटोमी’ ही जटिल शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. ही शस्त्रक्रिया दीड ते दोन तास चालली. शस्त्रक्रियेच्या दरम्यान डॉक्टरांनी अत्यंत कौशल्याने मेंदूमधील रक्ताची गाठ काढून टाकली आणि रक्तस्त्राव थांबवण्यात यश मिळवले. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर काही काळ रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवून त्यांची प्रकृती बारकाईने निरीक्षणाखाली ठेवण्यात आली. हळूहळू रुग्णाची प्रकृती सुधारू लागली. काही दिवसांच्या उपचारानंतर शंकर महाजन यांना शुद्ध आली आणि त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आली.

अपघातानंतर एका तासाच्या आत म्हणजेच गोल्डन अवर्समध्ये हा रूग्ण आल्यानंतर तातडीने सीटी स्कॅन करून निदान केले असता एक्स्ट्रा ड्युरल हिमॅटोमा ही गंभीर अवस्था आढळून आली असली तरी वेळेवर शस्त्रक्रिया केल्यास रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य होते. या प्रकरणात रुग्णाला वेळेत उपचार मिळाल्यामुळेच त्यांचे जीवन वाचवता आले.योग्य वेळी घेतलेला निर्णय आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य यामुळे शंकर महाजन यांना नवजीवन मिळाले आहे.

-डॉ. श्रृती खंडागळे,
डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

 दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; शहर पोलिसांत गुन्हा

Next Post

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

आमोदे गौण खनिज प्रकरण गाजले; यावल तहसीलदारांवर शिस्तभंग कारवाईची शिफारस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
1xbet russia

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

September 24, 2026
वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी
जैन कंपनी

आंतर जिल्हा टी – २० वरिष्ठ गटांसाठी रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी मुलांची क्रीकेट चाचणी

September 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

ZP शाळांचा दबदबा! ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

September 24, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीत ‘फिजिओ गणेशात्सवातून जनजागृती

September 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon