जळगाव (प्रतिनिधी):- भरधाव वेगात आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याने झालेल्या दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कानळदा रोडवरील केसी पार्कजवळ घडली. या अपघातात अक्षय संजय देशमुख (वय ३०, रा. कांचननगर) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा मित्र गणेश सावळाराम पवार (वय ४०, रा. कुसुंबा, ता. जळगाव) गंभीर जखमी झाला होता. ही घटना २ मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी जखमी गणेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक अशोक खेडकर करीत आहेत.











