• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आंचलवाडीत विहिरीत क्रेन कोसळून चालक ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 30, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आंचलवाडीत विहिरीत क्रेन कोसळून चालक ठार

दोन मजूर थोडक्यात बचावले

अमळनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील आंचलवाडी शिवारात विहिरीचे काम सुरू असताना एक भीषण अपघात घडला. माती काढणारी क्रेन थेट विहिरीत कोसळल्याने राजस्थानमधील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय क्रेन चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर विहिरीत असलेल्या दोन मजुरांनी समयसूचकता दाखवल्याने त्यांचे प्राण थोडक्यात बचावले. ही घटना मंगळवारी (२८ एप्रिल) सकाळी घडली.

आंचलवाडी शिवारातील पंडित विनायक पाटील यांच्या शेतातील कोरड्या विहिरीची खोली वाढवण्याचे काम सुरू होते. मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने विहिरीतील दगड आणि माती बाहेर काढली जात होती. यावेळी क्षमतेपेक्षा जास्त भार झाल्याने विहिरीच्या काठावर उभी असलेली क्रेन अचानक अनियंत्रित होऊन थेट विहिरीत कोसळली.

या अपघातात क्रेन चालक राजूलाल नारायणलाल गुर्जर (वय ३२, रा. भेरुखेडा, जि. भिलवाडा, राजस्थान) हे क्रेनसोबत विहिरीत फेकले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ज्यावेळी क्रेन विहिरीत कोसळली, तेव्हा विहिरीच्या तळाशी दोन मजूर माती भरण्याचे काम करत होते. वरून अजस्त्र क्रेन अंगावर पडत असल्याचे पाहताच, या मजुरांनी क्षणाचाही विलंब न करता विहिरीच्या भिंतीचा आधार घेतला आणि कडेला चिकटून उभे राहिले. त्यांच्या डोळ्यादेखत क्रेन कोसळली, मात्र भिंतीला चिकटून राहिल्याने ते या भीषण अपघातातून सुखरूप बचावले.

याप्रकरणी महावीर गुर्जर यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात माहिती दिली. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर राजूलाल गुर्जर यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी राजस्थानकडे रवाना करण्यात आला. मृत राजूलाल यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार असून, ते सध्या जवखेडा येथे वास्तव्यास होते. याबाबत अमळनेर पोलिसात बुधवारी (२९ एप्रिल) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल काशीनाथ पाटील आणि सागर साळुंखे करत आहेत.


 

 

Tags: #amlner crime #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

३९ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण

Next Post

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 16, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
जैन कंपनी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon