जळगाव शहरात मध्यवर्ती चौकात घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील गजबजलेल्या आकाशवाणी चौकातून धावत्या बसच्या डिक्कीतून दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी दुर्गा रवींद्र राठोड (वय ३०, रा. सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) या २७ एप्रिल रोजी प्रवास करत असताना दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातून त्यांची बस जात होती. यावेळी बसच्या डिक्कीमध्ये ठेवलेले त्यांचे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले.एकूण किंमत १२,५०० रुपयेचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.
आपले दागिने आणि पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच दुर्गा राठोड यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र ठाकरे करीत आहे.









