• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
प्रसाधनगृह अस्वच्छ ठेवणाऱ्या  ठेकेदाराला तात्काळ नोटीस द्या,  प्रसंगी ठेका रद्द करा : महापौर दीपमाला काळे

दोन्ही बी.जे. मार्केटमधील समस्यांबाबत नगरसेवकांचे पदाधिकाऱ्यांची बैठक

जळगाव  (प्रतिनिधी)- जळगाव शहर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये गाजलेल्या  प्रसाधनगृह स्वच्छतेच्या प्रश्नावर महापौर दीपमाला काळे यांनी तातडीने पावले उचलली आहेत. बुधवारी (१ एप्रिल) महापालिकेत आयोजित विशेष बैठकीत महापौरांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या शौचालय ठेकेदाराला अंतिम नोटीस देऊन प्रसंगी त्याचा मक्ता (ठेका) रद्द करण्याचे कठोर आदेश दिले आहेत.

प्रसाधनगृहांची दुरवस्था आणि सुरक्षा ऐरणीवर
महासभेत स्थानिक नगरसेवक तथा शिवसेना गटनेते  विष्णू भंगाळे, नगरसेविका अर्चना संजय पाटील यांनी मार्केटमधील प्रसाधनगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत नवीन व जुन्या बीजे मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढाच वाचला. जुन्या बीजे मार्केटमधील कारंजा नादुरुस्त असणे, रात्रीच्या वेळी विद्युत दिव्यांअभावी पसरणारा अंधार आणि त्यातून होणारे गैरप्रकार, ट्रान्सपोर्ट कंपन्यांच्या अतिक्रमणामुळे तुटलेली गेट्स आणि वाहन पार्किंगची समस्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची कमतरता आदी समस्या सांगितल्या.

नगरसेवकांनी व्यक्त केला संताप
नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी सांगितले की, “शौचालयांच्या अस्वच्छतेमुळे मार्केटमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली असून व्यापाऱ्यांना व ग्राहकांना तेथे उभे राहणे कठीण झाले आहे.” तर नगरसेविका अर्चना पाटील यांनी मार्केटमध्ये रॅम्प नसल्याने होणारी अडचण आणि सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे निर्माण झालेला गंभीर प्रश्न मांडला. प्रसाधनगृहात ठेकेदार भंगार साठवून ठेवत असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली.

महापौरांचे कडक निर्देश
सर्व तक्रारी ऐकून घेतल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाला पुढील आदेश दिले.
ठेकेदारावर कारवाई: प्रसाधनगृहाची स्वच्छता न राखणाऱ्या ठेकेदाराला नोटीस द्या आणि समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्याचा ठेका तात्काळ रद्द करून नवीन नियुक्ती करा.
स्वच्छता अभियान: महापौरांच्या संकल्पनेतून येत्या शुक्रवारी बी.जे. मार्केटमध्ये विशेष ‘साफसफाई अभियान’ राबवले जाईल. त्यापूर्वी गुरुवारी अधिकारी प्रत्यक्ष जागेची पाहणी करतील.
लिफ्ट आणि पायाभूत सुविधा: मार्केटमध्ये लिफ्ट बसवण्यासाठी तांत्रिक इस्टिमेट (अंदाजपत्रक) तयार करण्याचे आदेश महापौरांनी बांधकाम विभागाला दिले.

या बैठकीला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, शिवसेनेचे गटनेते विष्णू भंगाळे, नगरसेविका अर्चना पाटील, आशा पाटील, नगरसेवक अमित काळे, सहाय्यक आयुक्त उदय पाटील, स्वच्छता अधिकारी अनिल कांबळे, पाणीपुरवठा प्रमुख शामकांत भंडारकर, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, विद्युत विभागाचे संदीप मोरे यांच्यासह आरोग्य, बांधकाम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

“गेल्या १५ वर्षांत आम्हाला समस्या मांडण्यासाठी महापालिकेत कधीही बोलावले गेले नव्हते. महापौरांनी स्वतःहून स्वारस्य दाखवून आमची बाजू ऐकून घेतली, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.”

— असोसिएशन पदाधिकारी


 

 

Tags: #jalgaon manpa news
Previous Post

जळगाव कचरा डेपो येथील रखडलेली कामे मार्गी लागणार

Next Post

साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण

साकळीत किरकोळ वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या आणि लोखंडी हुकने मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष
1xbet russia

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू
1xbet russia

गोदावरी नर्सिंगचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे यांचा अपघाती मृत्यू

May 17, 2026
पोलीस अधीक्षक स्वतः रस्त्यावर उतरले; सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या तळीरामांची धुंदी उतरवली!
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कर्जाने येथे युवा श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

May 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

गोदावरी आय. एम. आर.मध्ये पाच दिवसीय राष्ट्रीय प्राध्यापक विकास कार्यक्रम उत्साहात

May 17, 2026
२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

२४ तासांच्या अखंड कोडिंगव्दारे नवकल्पनांचा महाउत्सव गोदावरी हॅकॅथॉन १.० चा जल्लोष

May 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon