• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लाचेची मागणी केल्याप्रकरणी करंज येथील तलाठ्यावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई

जळगाव (प्रतिनिधी):- शेतजमिनीची खरेदी नोंद लावण्यासाठी ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी जळगाव तालुक्यातील सजा करंज येथील तलाठ्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय बिडवे असे गुन्हा दाखल झालेल्या लोकसेवकाचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराने आपल्या पत्नीच्या नावे संबंधित तलाठ्याच्या कार्यक्षेत्रात शेतजमीन खरेदी केली होती. या खरेदी केलेल्या क्षेत्रावर सरकारी दप्तरी नोंद करण्यासाठी तलाठी अजय बिडवे यांनी ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), जळगाव यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.

तक्रारीची शहानिशा करण्यासाठी २७ फेब्रुवारी रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी तलाठी बिडवे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, तक्रारदार जेव्हा लाचेची रक्कम देण्यासाठी गेले, तेव्हा संशय आल्याने लोकसेवकाने ती रक्कम स्वीकारली नाही. लाचेची रक्कम स्वीकारली नसली तरी, लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी या कारवाईचे पर्यवेक्षण केले असून, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. या पथकात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, दिनेशसिंग पाटील, संगिता पवार, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी आणि प्रणेश ठाकूर यांचा समावेश होता.

कोणत्याही लोकसेवकाने कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा ०२५७-२२३५४७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

Next Post

महापौर दीपमाला काळे यांचे ५० किमी सायकलिंग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
महापौर दीपमाला काळे यांचे ५० किमी सायकलिंग

महापौर दीपमाला काळे यांचे ५० किमी सायकलिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon