• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 26, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ निर्मितीमुळे महिला सबलीकरणासोबत उपजीविकेच्या संधी: पाटील

रोटरी जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कार्यशाळेस सुरुवात

वैजापूर(ता. चोपडा)- रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या मोहफुलांपासून पौष्टिक पदार्थ बनविण्याच्या कार्यशाळेमुळे महिला सबलीकरणासोबतच उपजीविकेच्या अनेक संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आदिवासी विकास विभाग यावलचे सहायक प्रकल्पाधिकारी सतिश पाटील यांनी व्यक्त केली. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सरपंच दत्तर सिंग पावरा, वनरक्षक विजय शिरसाठ, प्रशिक्षक डाॅ. सतिश गोगुलवार, शालिनीताई, अध्यक्ष गिरीश कुळकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर, संवाद सचिव पंकज व्यवहारे, विद्याताई आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस मान्यवराचे हस्ते सुती अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रशांत सुर्यवंशी यांनी जीवन में कुछ करना है तो हिम्मत हारे मत बैठो… हे गीत सादर केले.

सरपंच दत्तर सिंग पावरा म्हणाले मोहफुलांचा उपयोग केवळ दारु बनविण्यासाठी माहिती होता मात्र रोटरी व गांधीतीर्थमुळे या नवीन पदार्थांची माहिती झाल्याचे सांगितले. वनरक्षक विजय शिरसाठ यांनी वनसंपदा आपल्यासाठी असून तिचा सुयोग्य कारणासाठी वाहावा. वनसंपदेच्या संवर्धन व मुल्यसंवर्धन याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता सांगितली. डाॅ. गोगुलवार यांनी आपण कार्यशाळेतून मिळालेले शिक्षण व्यवहारात उपयोगी आणावे असे आवाहन केले. आयोजकांनी महिलांनी निर्माण केलेल्या पदार्थांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे असेही आवाहन केले.

आज कार्यशाळेत मोहफुलांचा चिवडा, मोहफुलांचे लाडू व केक बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यशाळेस ३८ आदिवासी भगिनींनी सहभाग घेतला आहे. दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सुर्यवंशी यांनी तर आभार सचिव सुभाष अमळनेरकर यांनी मानले. कार्यक्रमास चंद्रकांत चौधरी, अर्जुन प्रसाद, रौनक, सतिश चौरसिया, पायल, अश्विनी, राखी, अभिषेक, वैभव, रजत, जयश्री, आशिक, आयुष, राहुल, युवराज कोळी, बाळू बारेला आदी उपस्थित होते.

आज जळगावात डाॅ. सतीश गोगुलवार व्याख्यान

रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आरोग्य तज्ज्ञ सतीश गोगुलवार यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

व्याख्यान शुक्रवार, दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सायं. ७.३० वाजता, रोटरी हॉल, गणपती नगर, जळगाव येथे होणार आहे. आम्ही आमच्या आरोग्यासाठी या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. डाॅ. गोगुलवार हे सर्वोदयातील कार्यकर्ते असून त्यांच्यावर महात्मा गांधी व जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचा प्रभाव आहे. एमबीबीएसचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी गडचिरोलीतील आदिवासी बांधवाच्या सहकार्याने आरोग्य, जल, जंगल व जमीन या विषयात मागील चार दशकांपासून काम करीत आहे. २०२४ चा इंटरनॅशनल ह्युमॅनिटरिअन ॲवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त डाॅ. सुदर्शन आयंगार व रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष गिरीश कुळकर्णी यांनी केले आहे.


 

 

Tags: mohfulapasun-poshtik-padarth news
Previous Post

जळगावात रामनवमीचा अभूतपूर्व उत्साह

Next Post

लाचेची मागणी केल्याप्रकरणी करंज येथील तलाठ्यावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

लाचेची मागणी केल्याप्रकरणी करंज येथील तलाठ्यावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली
Uncategorized

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक
जैन कंपनी

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये आज स्वातंत्रता दिनानिमीत्त विविध कार्यक्रम
1xbet russia

राष्ट्रीय ग्रंथालय दिन व अवयव दान दिनानिमीत्त जनजागृती

August 14, 2026
बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग
1xbet russia

बोदवड येथे ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ विषयावर सीएमई; ४५ जनरल प्रॅक्टिस डॉक्टरांचा सहभाग

August 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

अमळनेरचे तहसीलदार  निलंबित; महसूल अधिकारी संघटना तहसीलदारांच्या समर्थनार्थ एकवटली

August 14, 2026
अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon