• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई, विश्व
0
 जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार

केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर झाल्या सह्या

जळगाव, (प्रतिनिधी) – केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत जळगावच्या जैन हिल्सवर भारतीय कृषी अनुसंधान परिषद- राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिची आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यामध्ये केळीच्या ‘कावेरी वामन’ व ‘कावेरी पुवन’ या दोन नवीन जातींच्या रोपांची टिश्यूकल्चर पद्धतीने निर्मिती करण्यासंबंधीचा सामंजस्य करार झाला.

या कराराच्यावेळी जैन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सह-व्यवस्थापकीय संचालक अजित जैन व अतुल जैन आणि राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन उपस्थित होते. राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रातर्फे डॉ. आर. सेल्व्हराजन आणि जैन इरिगेशनतर्फे टिश्यूकल्चर विभागाचे उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील व डॉ. के. बी. पाटील यांनी करारावर सह्या केल्या.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे झालेल्या केळी चर्चासत्रात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत कराराच्या प्रतींचे आदान प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिता वाघ, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सहसचिव प्रियरंजन दास, महाराष्ट्र राज्याच्या कृषी आयुक्तालयातील फलोत्पादन संचालक अंकुश माने, आयसीएआर चे एडीजी डॉ. व्ही. बी. पटेल, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जैन इरिगेशन कंपनी आता जळगांवमध्ये ‘कावेरी वामन’ आणि ‘कावेरी पूवन’ या जातीच्या केळी रोपांची निर्मिती करून ती शेतकऱ्यांना पुरविणार आहे.

या दोन्ही केळींच्या जातीची वैशिष्ट्ये
१) कावेरी वामन – ही जात ग्रॅन्ड नैन या केळीच्या जातीपासून ‘भाभा अणु संशोधन केंद्र’ मुंबई येथे विकसीत करण्यात आली आहे. ही जात ट्रिपल अे (AAA) या जीनोमिक गटातील असून ती सपाट भुभाग व चांगल्या निचऱ्याच्या जमिनीत उत्तम वाढते. झाड बुटक्या स्वरूपाचे असून उंची १५० ते १६० सें.मी. असते. खोडावर काळे-तपकिरी डाग दिसतात. झाडाचा आकार दंडगोलाकार असून घडाचे वजन १८ ते २५ किलो दरम्यान असते. पिकल्यावर फळे पिवळी होतात. गर क्रिम रंगाचा व चवीला गोड असतो. अतिसघन पद्धतीने या जातीची लागवड करता येते. झाडांना आधार द्यावा लागत नसल्यामुळे लागवड खर्चात १० टक्के बचत होते. वादळ-वाऱ्याचा प्रभाव असलेल्या व किनारी भागात लागवडीसाठी ही जात योग्य आहे. ११ ते १२ महिन्यात कापणीसाठी तयार होणारी ही जात वर्षभरात केव्हांही लावता येते. सरासरी उत्पादन हेक्टरी ५५ ते ६० टन येते.
२) कावेरी पूवन – ही जात लोकप्रिय अशा पूवन केळीच्या जातीपासून तयार करण्यात आली आहे. त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राने १५ वर्षे संशोधन करून ही जात विकसीत केली आहे. या जातीचे विशेष वैशिष्ठ म्हणजे ती विषाणूजन्य रोग व फुसारिअम विल्ट (मर रोग ) टीआर -1, टीआर -4 या अति घातक रोगाला प्रतिकारक असून स्थानिक पूवन जातीपेक्षा २० टक्के उत्पादन अधिक देते. या जातीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे ती खारट व क्षाराच्या जमिनीतही उत्तम येते.


 

 

Tags: https://kesariraj.com/jain-erigetion-keliche-don/
Previous Post

रावेरमध्ये भरवस्तीत घरफोडी; तीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Next Post

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

कचऱ्याचा ढीग अन् महापौरांचा ‘संताप’; लेवा बोर्डिंगबाहेरील स्थिती, नागरिकांनी मानले आभार..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
जैन कंपनी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल
1xbet russia

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
1xbet russia

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
1xbet russia

रावेरमध्ये बंद घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

September 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon