• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 16, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव मनपा : स्थायी समिती निवडीत महिलांना डावलल्याने नाराजी ; भाजपकडून २ नवख्या महिलांना तर सेनेकडून एकालाही संधी नाही !

‘पन्नास टक्के’ आरक्षणांनंतरही आर्थिक कणा असलेल्या समितीतून महिला दूरच !

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहर महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. मात्र, या निवडींमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी अनुभवी महिला नगरसेविकांना संधी न दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७५ सदस्यांच्या महापालिकेत ३९ महिला प्रतिनिधी असतानाही, मुख्य समितीमध्ये त्यांना स्थान न मिळाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

भाजपचा नवा फॉर्म्युला, पण अनुभवींना डच्चू
भारतीय जनता पक्षाने स्थायी समितीसाठी ५ अनुभवी आणि ५ प्रथमच निवडून आलेले अशा १० सदस्यांची नावे निश्चित केली. यात भाजपने दोन प्रथमच नवनियुक्त महिलांना संधी दिली असली, तरी तिसऱ्यांदा निवडून आलेल्या उज्वला बेंडाळे, तसेच दुसऱ्यांदा विजयी ॲड. शूचिता हाडा, जयश्री महाजन, रंजना वानखेडे आणि सुरेखा तायडे यांसारख्या ज्येष्ठ महिला नगरसेविकांना डावलण्यात आले आहे. यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात चर्चा सुरू असून अनेकांनी नेतृत्वाकडे आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

शिवसेनेतही महिलांना स्थान नाही
दुसरीकडे, मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) कडूनही महिलांच्या पदरी निराशाच पडली आहे. दुसऱ्यांदा निवडून आलेल्या सिंधुताई कोल्हे, प्रतिभाताई देशमुख, मंगला चौधरी, रेश्मा काळे आणि रेखा चुडामन पाटील यांसारख्या एखाद्या अनुभवी महिलांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात एकाही महिलेला समितीत स्थान देण्यात आलेले नाही.

प्रतिनिधित्व असूनही संधीचा अभाव
जळगाव महापालिकेत ५० टक्के महिला आरक्षणामुळे ७५ पैकी ३९ महिला नगरसेविका आहेत. प्रभाग क्रमांक १ चा अपवाद वगळता प्रत्येक प्रभागात २ महिला नगरसेविका असतानाही, सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या स्थायी समितीमध्ये महिलांना डावलले गेल्याने “महिला सक्षमीकरण” केवळ कागदावरच आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्थायी समिती म्हणजे काय?
स्थायी समिती ही महानगरपालिकेतील सर्वात शक्तिशाली आणि महत्त्वाची समिती मानली जाते. महापालिकेचे सर्व आर्थिक व्यवहार, बजेटला मंजुरी देणे आणि विकासकामांच्या निविदांना प्रशासकीय मान्यता देणे हे अधिकार या समितीकडे असतात. एक प्रकारे, महापालिकेची ‘तिजोरी’ आणि विकासाची मुख्य सूत्रे स्थायी समितीच्या हातात असतात.

Tags: #jalgaon manpa news
Previous Post

अनुभवी नगरसेवकांसह नव्यांनाही प्राधान्य, दोन्ही पक्षांकडून पहिल्या वर्षी विकासाचे नियोजन

Next Post

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!
1xbet russia

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद
1xbet russia

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 16, 2026
वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

वीज तारा चोरणारी टोळी गजाआड; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 16, 2026
प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा
1xbet russia

प्रभाग ५ मधील आरोग्य कार्यालयाची केली तपासणी, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

February 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

गोदावरी प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग स्पर्धेत डॉ.उल्हास पाटील इग्लिश सीबीएसई सावदा विजेता!

February 16, 2026
भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

भालोद मध्ये कृषी मेळाव्यास शेतकर्‍यांचा सकारात्मक प्रतिसाद

February 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!