• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
खळबळजनक : पेट्रोल पंपाची कोट्यवधींची रोकड घेऊन फौजदार बेपत्ता !

जळगावच्या दक्षता पेट्रोल पंप येथील प्रकार, पोलिसांचा सावध पवित्रा

जळगाव प्रतिनिधी : पोलीस दलाच्या कल्याणकारी विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या ‘दक्षता’ पेट्रोल पंपावरील जमा झालेली लाखो-कोट्यवधींची रक्कम बँकेत जमा न करताच, जबाबदार पोलीस उपनिरीक्षक गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाल्मीक मधुकर वाघ (५७, रा. साईनगर, निमखेडी शिवार) असे या बेपत्ता फौजदाराचे नाव आहे.

जळगाव शहर पोलीस दलाच्या वेलफेअर विभागाच्या वतीने जिल्हा पेठ परिसरात ‘दक्षता’ पेट्रोल पंप चालवला जातो. या पंपावर दररोज जमा होणारी रोकड विभागाच्या बँक खात्यात जमा करण्याची महत्त्वाची जबाबदारी उपनिरीक्षक वाल्मीक वाघ यांच्याकडे होती. मात्र, प्राथमिक माहितीनुसार गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पंपावर जमा झालेली मोठी रक्कम त्यांनी बँकेत भरलीच नसल्याचे समोर आले आहे.

दि.११ फेब्रुवारी रोजी वाघ यांनी आपण घरातून निघून जात असल्याचे आपल्या मुलाला कळवले आणि त्यानंतर ते बेपत्ता झाले. याप्रकरणी त्यांच्या मुलाने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. हा गैरव्यवहार नेमका किती रुपयांचा आहे, हे अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. मात्र, हा आकडा कोट्यवधींच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सध्या पोलीस प्रशासन या प्रकरणाचे ऑडिट करत असून, वाल्मीक वाघ यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलीस दलातीलच एका जबाबदार अधिकाऱ्याने असा प्रकार केल्याने जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

“पेट्रोल पंपावरील रकमेची जबाबदारी वाघ यांच्याकडे होती, मात्र ती बँकेत भरली गेली नसल्याचे दिसतेय. संबंधित व्यक्ती गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. नेमकी रक्कम किती आहे, हे ऑडिट (लेखापरीक्षण) पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.”
— डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक.


 

 

Tags: #caram
Previous Post

दिल्लीच्या तरुणाचे खोटे रिपोर्ट काढून विम्याचे पैसे लाटले !

Next Post

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर
1xbet russia

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली
1xbet russia

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
1xbet russia

 डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

April 2, 2026
रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा
1xbet russia

रेवा कुटी मध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा

April 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महा. व रूग्णालयात ३,४,५ एप्रिलला तिरळेपणासाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिर

मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास प्रचंड प्रतिसाद आज तज्ञांची टीम जळगावात

April 2, 2026
रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

रूग्णांची सेवा करू हीच स्व. गोदावरी आजींना आदरांजली

April 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon