• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 12, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

गजबजलेल्या रजा टॉवर चौकात भरदुपारी थरार

भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील अत्यंत गजबजलेल्या रजा टॉवर चौकात गुरुवारी दुपारी किरकोळ वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. अज्ञात इसमाने केलेल्या चाकू हल्ल्यात १३ वर्षीय बालक गंभीर जखमी झाला असून, अन्य एक २० वर्षीय तरुणही जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दुपारी ४ वाजेच्या सुमारास रजा टॉवर चौकात शेख समशेर शेख सलीम (वय १३) आणि मोहम्मद असत मोहम्मद अस्लम मेमन (वय २०) यांच्यात काही किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली, मात्र वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी अज्ञात व्यक्तीने धारदार चाकूने हल्ला चढवला. यात १३ वर्षीय शेख समशेर याच्या डाव्या कानाजवळ चाकूचा खोलवर वार लागल्याने तो जागीच रक्तबंबाळ होऊन कोसळला.

या झटापटीत मोहम्मद असत याच्या डाव्या मांडीवर चाकू लागल्याने तो देखील गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटर (ग्रामीण रुग्णालय) येथे दाखल केले.दुसऱ्या जखमी तरुणावर सध्या भुसावळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेची नोंद बाजारपेठ पोलीस ठाण्यात अद्याप झालेली नाही.

जखमींची प्रकृती स्थिर होताच त्यांचे जबाब घेऊन पुढील कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. भरदिवसा आणि गजबजलेल्या ठिकाणी घडलेल्या या हल्ल्यामुळे भुसावळकरांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. भरचौकात धारदार शस्त्राने हल्ला करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

“१३ वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असून तो काही काळ बेशुद्ध होता. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे,” अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख यांनी दिली.


 

 

Tags: bhusawal hadarle news
Previous Post

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

Next Post

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

आंतरमहाविद्यालयीन नृत्य स्पर्धेत डॉ. निकेतन जाधवचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon