जिल्हा परिषदेत वर्षभरापासून होते रिक्त पद
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार निलेश पाटील यांनी गुरुवारी दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी स्वीकारला. यावेळी विविध संघटनेच्या पदाधिकारी व नेत्यांनी तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन कारकिर्दीसाठी सदिच्छा दिल्या.

वर्ष-दीड वर्षापासून प्राथमिक शिक्षणाधिकारी हे पद रिक्त होते हा पदभार सध्या कल्पना चव्हाण, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे होता. मागील आठवड्यात शिक्षण विभागाने आदेश काढून निलेश पाटील यांची जळगाव येथे नियुक्तीचे पत्र काढले होते. आता निलेश पाटील यांच्याकडे पदभार आल्यामुळे प्राथमिक विभागाला कायमस्वरूपी शिक्षण अधिकारी मिळाले आहेत. यामुळे आता प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज वेगाने पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे दिवसभरात निलेश पाटील यांची विविध संघटनांच्या नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांना सदिच्छा दिल्या.









