• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

जळगाव ( प्रतिनिधी ) – तंत्रज्ञानाच्या युगात घड्याळ, मोबाईल आणि टीव्ही ज्याप्रमाणे ‘स्मार्ट’ झाले, त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातील वीज व्यवस्थाही कात टाकत आहे. महावितरणने राज्यातील सर्व वीज ग्राहकांसाठी ‘स्मार्ट टीओडी (टाइम ऑफ डे)’ वीजमीटर आणले असून, यामुळे ग्राहकांना केवळ अचूक बिलच मिळणार नाही, तर चक्क वीजदरात सवलत मिळवण्याची सुवर्णसंधीही उपलब्ध झाली आहे. जळगाव परिमंडलात आतापर्यंत साडेचार लाख ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी वीजमीटर बसवण्यात आले असून, त्यांना अचूक बिलासह सवलतीचा लाभ होत आहे. या उपक्रमाबाबत काही लोकांकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र ग्राहकांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता स्मार्ट मीटर बसवण्यास सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

महावितरणने यापूर्वीही काळानुसार वीज मीटरमध्ये बदल केले आहेत. यांत्रिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, इलेक्ट्रॉनिक मीटरनंतर आता स्मार्ट डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. जुने, सदोष किंवा नादुरुस्त मीटर बदलणे ही नियमित व कायदेशीर प्रक्रिया असून, त्यासाठी ग्राहकांची लेखी परवानगी आवश्यक नाही. ग्राहकांकडे बसवण्यात येणारे स्मार्ट टीओडी मीटर पूर्णतः मोफत असून, त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. यासाठी कोणतेही कर्ज काढलेले नसून केंद्र सरकारच्या अनुदानातून हा प्रकल्प राबवला जात असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

जळगाव परिमंडलात आजपर्यंत 4 लाख 47 हजार 122 ग्राहकांकडे स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. त्यात जळगाव मंडलात 2 लाख 76 हजार 982, धुळे मंडलात 1 लाख4 हजार 266 तर नंदुरबार मंडलात 65 हजार 874 मीटर सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे बसवण्यात आले आहेत.

दिवसा वापरावर सवलत : स्मार्ट टीओडी मीटर हे डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेनुसार वीज वापर मोजण्याची सुविधा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपयापर्यंत सवलत मिळत आहे. 1 जुलै 2025 पासून ही सवलत लागू झाली असून, घरगुती ग्राहकांसाठी अशा प्रकारचे ही पहिले ऐतिहासिक पाऊल महावितरणने उचलले आहे. एखादा घरगुती ग्राहक दरमहा 100 युनिट वीज वापरत असेल, तर जुन्या दरानुसार त्याचे बिल साधारणत: 875 रुपये येत होते. नवीन दरकपात आणि स्मार्ट मीटरच्या टीओडी सवलतीमुळे हेच बिल आता फक्त 784 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहक थेट आपले पैसे वाचवू शकतात.

सरासरी बिले होणार इतिहासजमा : अचूक रीडिंगमुळे ‘सरासरी’ किंवा ‘अंदाजे’ बिलांचा त्रास संपणार आहे. जेवढी वीज वापरली, तेवढेच बिल येणार. हे मीटर पूर्णपणे पोस्टपेड आहेत. सध्याच्या मासिक पद्धतीप्रमाणेच ग्राहकांना बिल भरायचे आहे. महावितरणच्या खास ‘अ‍ॅप’वर तुम्हाला तासागणिक किती वीज वापरली जात आहे, याची माहिती मिळेल. घर बंद असले तरी मीटर रीडिंग आपोआप मुख्यालयात नोंदवले जाईल.

सौर ऊर्जा ग्राहकांसाठी वरदान : ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प लावणाऱ्या ग्राहकांसाठी हे मीटर अत्यंत उपयुक्त आहे. हे मीटर नेट-मीटरिंगचे कामही करते, ज्यामुळे तुम्ही ग्रीडला दिलेली अतिरिक्त वीज आणि स्वतः वापरलेली वीज याचा अचूक हिशेब ठेवणे सोपे होईल.

ग्राहकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. स्मार्ट मीटर हे पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि वीजबिलात सवलत देण्यासाठीच आणले आहेत. तंत्रज्ञानाचा स्वीकार करा आणि आपले वीजबिल कमी करा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.


 

 

Tags: #jalgaon mahavitran #maharashtra #bharat
Previous Post

बैलगाडीच्या शिंगाड्याने मारहाण करून खून करणाऱ्या आरोपीस १० वर्षे सश्रम कारावास

Next Post

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला
1xbet russia

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू
1xbet russia

अरे बापरे ! पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात ९ वर्षांच्या बालकाचा मृत्यू

May 14, 2026
उत्‍तर महाराष्ट्रात एकमेव गोदावरी पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग अभ्यासक्रमासाठी परवानगी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १४ मे ‘गोदावरी हॅकॅथॉन १.०’चा जल्लोष,

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

पाचोर्‍याजवळ भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, चालकासह अन्य जखमी

May 14, 2026
महिला हरिनाम सप्ताहात जाताच चोरट्यांची घरफोडी ; ३ लाखाचा मुद्देमाल लांबवला

 पाचोर्‍यात घरफोडी; रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon