• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मध्य रेल्वेकडून तिकीट तपासणीत भुसावळ विभागाचा डंका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 11, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
केदारनाथ, बद्रीनाथसाठी जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे ११ दिवसांचे पॅकेज

मुंबईला मागे टाकत वसूल केला ६८.८६ कोटींचा दंड

भुसावळ ( प्रतिनिधी ) – मध्य रेल्वेने अनधिकृत आणि विनातिकीट प्रवाशांविरुद्ध आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उघडलेल्या मोहिमेत भुसावळ विभागाने अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या १० महिन्यांच्या कालावधीत भुसावळ विभागाने तिकीट तपासणीत मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये सर्वाधिक दंड वसुलीचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण झोनमध्ये एकूण २०३.७६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये भुसावळ विभागाने ८.१८ लाख प्रकरणांमध्ये तब्बल ६८.८६ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या मुंबई विभागालाही (६२.७३ कोटी) भुसावळ विभागाने दंड वसुलीच्या बाबतीत मागे टाकले आहे. संपूर्ण मध्य रेल्वेचा विचार करता, एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान ३४.३४ लाख विनातिकीट प्रवासी पकडले गेले, जे मागील वर्षाच्या तुलनेत ९.८% जास्त आहेत. जानेवारी २०२६ या एका महिन्यातच मध्य रेल्वेने २०.६० कोटी रुपये दंड वसूल केला, जो गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत ३२% जास्त आहे.

या कालावधीत मुंबई विभागात १४.५१ लाख प्रकरणांत ६२.७३ कोटी रुपये, पुणे विभागात ३.८४ लाख प्रकरणांत २३.७३ कोटी रुपये, नागपूर विभागात ३.६८ लाख प्रकरणांत २२.९१ कोटी रुपये, सोलापूर विभागात २.०६ लाख प्रकरणांत ९.४६ कोटी रुपये आणि मुख्यालय स्तरावर १६.०६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

भुसावळ विभागातून जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी पथकांनी अ‍ॅम्बुश तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी मोहीम राबवून ही कारवाई केली आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि सन्माननीय प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी रेल्वे बुकिंग काउंटर किंवा ‘रेल वन’ ॲपवरून अधिकृत तिकीट काढूनच प्रवास करावा. बनावट तिकीट तयार करणे किंवा त्यावर प्रवास करणे हा भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ अंतर्गत गंभीर गुन्हा असून, यासाठी दंड आणि ७ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. ‘सुरक्षित प्रवास करा, जबाबदारीने प्रवास करा’ असा संदेश रेल्वे प्रशासनाने या माध्यमातून दिला आहे.


 

 

Tags: #bhusawal relwey news #maharashtra #bharat
Previous Post

जळगावच्या विकासासाठी ३०० कोटींचा अतिरिक्त निधी द्या

Next Post

विभागीय आयुक्तांनी अपात्रतेची मागणी फेटाळली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
खळबळ : उघड्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने बालिकेचा मृत्यू, वाचविण्यास गेलेल्या पित्याचाही अंत !

विभागीय आयुक्तांनी अपात्रतेची मागणी फेटाळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

March 30, 2026
वाळू चोरी करताना वाहन पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त
1xbet russia

माहिती अधिकाराचा अर्ज केल्याच्या रागातून महिलेवर जीवघेणा हल्ला

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon