पहुरच्या तरुणाची अशीही कहाणी : पोलीस होण्याचे स्वप्न उराशी मात्र रवानगी झाली थेट तुरुंगा
जळगाव ( विशेष प्रतिनिधी ) – पोलीस भरती प्रशिक्षण अकादमीजवळ नाश्त्याच्या हातगाडीवर दोघांमध्ये ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र सदर तरुणी ही तृतीयपंथी असल्याचे लक्षात आल्यावर आणि तिने लग्नाचा तगादा लावल्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणाने अखेर या प्रेम कहाणीचा अंत केला. सदर तरुणीची हत्या करून तिला जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही कहाणी आहे, पहूर येथील तरुणाची… घटना घडली आहे एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान जवळ जंगलात…



स्वप्निल उर्फ गोलू अशोक पाटील (वय २१, रा. पहूर ता.जामनेर) असे खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या या संशयित आरोपीचे नाव आहे.तर आकांक्षा उर्फ अजय हेमराज गद्रे असे मयत तृतीयपंथीयाचे नाव आहे. आकांक्षा मूळ छत्तीसगड राज्यातील राहणारी असून सध्या सुरत येथे वास्तव्याला होती. स्वप्नील 2024 मध्ये पोलीस भरती परीक्षा नाशिकला देत शिक्षण घेत होता.(केसीएन)दरम्यान काही महिन्यांपूर्वी नाशिक येथे पोलीस भरती अकादमीच्या बाहेर असणाऱ्या एका नाश्त्याच्या गाडीवर त्याची ओळख आकांक्षा उर्फ अजय हेमराज गड्रे हिच्याशी झाली. पुढे एकमेकांचा मोबाईल नंबर घेऊन चॅटिंगद्वारे दोघांच्या ओळखी वाढल्या. ओळखीतून त्यांच्यामध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. सदर तरुणी ही तृतीयपंथीय असून स्वप्निलनचा पिछा सोडत नव्हती

अखेर स्वप्निलने आकांक्षाला त्याचा पिच्छा सोडण्यास सांगितले. मात्र ती तयार नव्हती. आकांक्षा पहूरला स्वप्निलच्या घरी देखील आली होती. कंटाळून स्वप्निलच्या आई-वडिलांनी त्याला आकांक्षाचा नाद सोड म्हणून सांगितले. अखेर आकांक्षाने, दुसऱ्या मुलीसोबत लग्न कर आणि माझ्यासोबतही लग्न कर असा प्रस्ताव मांडला.(केसीएन)अखेर दोघांमध्ये तेव्हा तात्पुरता समझोता झाला होता. मात्र तरीही आकांक्षाने स्वप्निलचा पिच्छा सोडला नाही.
या सगळ्या आकांक्षाच्या त्रासाला स्वप्निल कंटाळला. अखेर त्याने कठोर निर्णय घेतला. आकांक्षाला भेटायला जळगाव तालुक्यात सुरतवरून बोलावले. सुरतवरून आकांक्षा उर्फ अजय गड्रे हा जळगाव येथे शनिवारी दि. ३१ जानेवारी रोजी उतरला. स्वप्निल आणि आकांक्षा दोघांनी रस्त्यामध्ये एका दुकानातून दोन बियरच्या बाटल्या घेतल्या.(केसीएन)त्या बाटल्या घेऊन ते पद्मालय येथे दुपारी ४ वाजता गेले. पद्मालय येथे श्री गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी जवळच्या जंगलात गप्पा मारण्यासाठी गेले. तेथे स्वप्निलने आकांक्षाला शेवटचे पुन्हा एकदा समजावले. मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही. माझा नाद सोड. मात्र आकांक्षाने काही ऐकले नाही.
अखेर आकांक्षाच्या सततच्या त्रासाला कंटाळून स्वप्नीलने आकांक्षा सोबत हातापायी केली. ती खाली पडली त्यानंतर अर्धमेले अवस्थेतील आकांक्षाचा तिच्याच ओढणीने गळा दाबून जीवे ठार मारले. ती मेल्याची खात्री केल्यानंतर त्याने त्याच्या डिस्कवर दुचाकीच्या डीक्कीतून पेट्रोल बाटलीतून बाहेर काढले आणि ते मयत झालेल्या आकांक्षाच्या चेहऱ्यापासून खाली शरीरावर टाकले आणि थेट पेटवून दिले. यानंतर त्याने तिथून पळ काढला.

पोलिसांनी घटनास्थळी पडलेल्या बियरच्या बॅचवरून तपासाला सुरुवात केली. सदर बॅचवरून दुकानाचा माग काढला. ज्या दुकानातून दोघांनी बियर घेतले होत्या, तेथे आकांक्षाने फोनवरून पेमेंट केले होते. (केसीएन)या ऑनलाइन पेमेंट वरून तिची ओळख पोलिसांना पटली. त्यानंतर तिच्या पायाचे नेलपॉलिश आणि नाकातील मुरणी यावरून तिची ओळख पटण्यास मदत झाली.
तसेच बियर बार दुकान आणि पद्मालय मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणावरून संशयित आरोपी पहुर येथील स्वप्निल अशोक पाटील यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले. त्यानंतर त्याला ताब्यात घेतल्यानंतर व पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.(केसीएन)त्यानंतर सदरची घटना आणि महिलेची ओळख पटली. या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक सोपान गोरे, पीएसआय शरद बागल, जितेंद्र वल्टे, अंमलदार ईश्वर पाटील, पहुर पोलीस स्टेशनच्या अंमलदार विनोद सुभाष पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.









