पाल वन्यजीव विभागाची मोठी कारवाई
रावेर ( प्रतिनिधी ) – पाल वन्यजीव विभागाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे धडक कारवाई करत, निमड्या नियतक्षेत्रात बेकायदेशीर शिकार करणाऱ्या सहा आरोपींना रंगेहात पकडले आहे. त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरलेली बंदूक आणि वन्य प्राण्याचे मांस जप्त करण्यात आले आहे.


कारवाईचे ठिकाण: निमड्या नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ५२ येथे ३१ जानेवारी रोजी कारवाई करण्यात आली. एक बंदूक आणि वन्य प्राण्याचे मांस जप्त करण्यात आले आहे.
सुनील पावरा, अर्जुन पावरा, नवलसिंग पावरा, बाळू पावरा, श्रीराम बारेला आणि राजाराम पावरा (सर्व रा. निमड्या) यांना अटक करण्यात आली आहे.
वन्यजीव विभागाला निमड्या परिसरात शिकार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने तातडीने सापळा रचून ही यशस्वी कारवाई केली.
ही कारवाई वन्यजीव विभागाचे वरिष्ठ अधिकारी रामगावकर (वन संरक्षक, मुंबई), कृष्णा भवर (उपवनसंरक्षक) आणि एस. बी. निकत (सहाय्यक वन संरक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाईचे नेतृत्व वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांनी केले. या कारवाईत वनपाल रजनी धोडके, संभाजी सूर्यवंशी, तसेच वनरक्षक जगदीश बारेला, रियाज तडवी, शालिग्राम राठोड, जगदीश चव्हाण, आदिल शेख, बबलू खान व बाबू भोई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.









